सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक पी.जे.टोंगे यांचा प्रामाणिकपणा 

52

🔸नजर चुकीने बँक खात्यात जमा केलेले सत्तर हजार रुपये प्रा. देवेंद्र पुसदेकर यांना परत केले

✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.14 डिसेंबर) :- भद्रावतीच्या बगडेवाडी येथील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक पी.जे.टोंगे यांच्या बँक खात्यात काल दि. १३ डिसेंबर रोज बुधवार रोजी सत्तर हजार रुपये जमा झाले.

         सदर रक्कम भद्रावती तालुक्यातील चोरा येथील स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. देवेंद्र पुसदेकर यांच्या नजर चुकीने ऑनलाईन बैंकींग करतांना सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक पी.जे.टोंगे यांच्या बँक खात्यात जमा झाली. काल दि. १३ डिसेंबर रोजी प्रा. देवेंद्र पुसदेकर यांनी पी.जे.टोंगे यांच्याशी संपर्क साधला. टोंगे यांनी क्षणाचाही विलंब न लावता संपूर्ण रक्कम परत करण्याची तयारी दर्शविली.

आज दि. १४ डिसेंबर रोजी पी.जे.टोंगे यांनी प्रा. देवेंद्र पुसदेकर यांना सत्तर हजार रुपयाचा चेक दिला.पी.जे.टोंगे आणि प्रा. देवेंद्र पुसदेकर दोघेही बँकेत गेले. प्रा. देवेंद्र पुसदेकर यांच्या बँक खात्यात सत्तर हजार रुपयाचा चेक जमा करण्यात आला.पी.जे.टोंगे यांनी प्रामाणिकपणे रक्कम परत केल्याबद्दल प्रा. देवेंद्र पुसदेकर यांनी त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त केली.