आज पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप – शाळा, कॉलेज, रुग्णालय अनेक शासकीय विभाग राहणार बंद Government employees will be on indefinite strike from today,schools,colleges,hospitals,many government departments will remain closed

338

🔸१८ लाख कर्मचारी जाणार संपावर

 18 lakh employees will go on strike

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर(दि.14 मार्च) :- राज्यातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी. या प्रमुख मागणीसाठी हे सर्व सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत.

     या सरकारी कर्मचाऱ्यांमुळे सरकारी रूग्णालये, शाळा, महाविद्यालये, पालिका, काही सरकारी विभागातील कामकाज ठप्प होणार आहेत. दरम्यान, राज्यसरकार आणि आंदोलक कर्मचारी यांच्यात आज बैठक झाली मात्र ही बैठक निष्फळ ठरली. 

      त्यामुळे आक्रमक निर्णय घेत सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. तर सरकारकडून समिती स्थापन करणार असे सांगण्यात जरी आले असले तरी निर्णयाची शाश्वती सरकार देत नसल्याने कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

https://smitdigitalmedia.com/