भवानजीभाई चव्हाण विद्यालयाचा वर्ग 10 विचा निकाल 91.43 टक्के Bhawanjibhai Chavan Vidyalaya Class 10 result 91.43 percent

✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadravti प्रतिनिधी)

भद्रावती (दि.2 जून) :-

       महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – 2023 मध्ये घेण्यात आलेल्या वर्ग 10 वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल दि.02, जून 2023 ला मंडळाच्या संकेत स्थळावर घोषित झाला असून या निकालात भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित, भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूरचा निकाल 91.43% लागला असून वर्ग 10 विला 397 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

त्यापैकी 363 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 78 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, 148 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 104 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 33 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.. विद्यालयातून अनुक्रमे कु. प्रतिक्षा शरद दुर्योधन 94.40% अथर्व भारत धोंगडे 93% कु अनघा कुंडलिक दामले 91.60%

शिवम अरुण पंधरे 90.60%

कु मोहिनी चंद्रशेखर गाऊत्रे 90.40, रेशित धिरज बोरकर 89.60, सागर भाऊराव बावणे 89.20 विनीत विजय मुनघाटे 89% प्रज्वल देविदास खोब्रागडे 89% जियांत विठोबा करमरकर 88.80% या विद्यार्थ्याना विद्यालयातून अनुक्रमे येनाचा मान मिळाला आहे. सदर विद्यार्थांना शाळेत बोलावून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला..

    विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशा बद्दल भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चुन्नीलालभाई चव्हाण साहेब, कार्याध्यक्ष रमनिकभाई चव्हाण साहेब, उपाध्यक्ष ऍड. वामनराव लोहे साहेब, सचिव केशवराव जेनेकर साहेब, सहसचिव लक्ष्मणराव धोबे सर, मुख्याध्यापक सी. डी. तंन्नीरवार सर, शाळेचे उपमुख्याध्यापक सी.बी. टोंगे सर, पर्यवेक्षक सहारे मॅडम.

विधाते सर, जयंत टोंगे सर तसेच सर्व शिक्षक – शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील उज्जवल शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन श्रीमती जवादे मॅडम यांनी केले… सदर निकाल प्रक्रियेत परीक्षा विभाग प्रमुख श्री ढवस सर व सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले..