अंध विद्यार्थ्यांनी दिला संदेश,पर्यावरणपुरक होळी साजरी करण्याचा Blind students gave a massage to celebrate eco-friendly Holi

118

✒️ परमानंद तिराणिक वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.4 मार्च) :-आनंद अंध विद्यालय, आनंदवनाच्या मैदानात पर्यावरणपुरक जलसरंक्षण आणि नैसर्गिक रंगाचा वापर करून होळी साजरी करूया असा संकल्प करून नाविण्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविण्यात आला.

                 सकाळच्या वेळेस अंध विद्यार्थ्यांनी मैदान साफसफाई करून जमा झालेला केरकचरा एकत्र करून सामुहिक पध्दतीने होळीचे दहन केले. शाळेचे मुख्याध्यापक सेवकराम बांगडकर यांनी पानझडी पडलेल्या पानांची प्लेकार्डसच्या माध्यमातून पर्यावरणपुरक उत्सवाचे महत्त्व समजावून सांगितले.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांनी पाण्याचा वापर टाळा,कोरडी होळी खेळा, हानिकारक ज्वलनशील रंगाचा वापर करू नका, होळीत प्लाँस्टिक सारख्या वस्तू टाकु नका. असे आवाहन अंध विद्यार्थ्यांना केले. भारतीय सण उत्सवांमागे काही धारणा आहेत. परंपरेतही काही चांगल्या बाबी असतात. परंतु भौतिक सुखाच्या चुकीच्या कल्पनांमुळे आयुष्यावर परिणाम होतो.

सणांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पाणी वाचविण्याचे आणि पर्यावरणस्नेही होळी खेळण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन बांगडकर यांनी केले. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक परमानंद तिराणिक, तनुजा सव्वाशेरे, राकेश आत्राम, विलास कावणपुरे, साधना ठक, कृष्णा डोंगरवार, वर्षा उईके आदिनी या अभियानाला सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्ग उपस्थित होते.

https://smitdigitalmedia.com/