गरीबाची भाकर श्रीमंताच्या चुलीवर  Bread of the poor on the hearth of the rich

🔸हॉटेलमध्ये , लग्न समारंभात मेनू म्हणून आवडीने वापर

Likely as a wedding menu at the hotel

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.2 मार्च) :-शेतकरी बळीराजाला शेतामध्ये काम करताना चुलीवरची भाक ताकद देत असायची चुलीवरची ज्वारी, बाजरी ची भाकर ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाची मानली जात होती, महिला दगडाच्या चुलीवर, मातीच्या चुलीवर तयार करून भाकरीला वेगळी चव येत होती..

हल्लीच्या काळात पोळीपेक्षा भाकरी महाग झाली आहे तर भाकरीचे आयुर्वेदिक महत्त्व वाढले असून बाजारामध्ये ज्वारी, बाजरीची किमतीमध्ये वाढ झालीली आहे तसेच हॉटेलमध्ये सुद्धा पोळीपेक्षा भाकरीची किंमत जास्त पहायला मिळते ज्वारी पिकाचा शेतातील पेरा सगळीकडे कमी झाल्याने शहरात भाकरीवर ताव मारणारे नागरिक झुणका भाकर हॉटेलकडे वळत आहे..

ज्वारी मध्ये कार्बोडायष्ट्रेसचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतामध्ये काम करतांना ऊर्जा पटकन मिळत असते आजच्या धकाधकीच्या, काळात वातावरणाच्या बदलत्या काळानुसार जनतेनी जेवनातील आहराला महत्व देणे आवश्यक आहे, माणसाचे आरोग्य चांगले राहावे त्याकरता आरोग्याची काळजी घेणे सर्वांना आवश्यक आहे त्यामुळेच झुणका भाकर केंद्राकडे जास्त प्रमाणात नागरिक वळत आहे.

बाजारामध्ये 35 ते 40 रुपये किलो ज्वारी बाजरी मिळत असून गहू 22ते 25 रुपये किलो मिळत आहे, लग्न समारंभामध्ये स्टेटस च्या माध्यमातून जेवायला मेनू म्हणून झुणका भाकर यांच्या मोठा प्रमाणात उपयोग केला जातो तसेच हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात झुणका भाकर उपलब्ध होत असून ग्रामीण भागातील चुलीवरची भाकर आता श्रीमंताच्या गॅसवर मिळताना दिसत आहे…..