Home चंद्रपूर सांसद ग्राम चंदनखेडा येथे शिव जयंती उत्साहात साजरी

सांसद ग्राम चंदनखेडा येथे शिव जयंती उत्साहात साजरी

0

?विवीध ठिकाणी अनेक कार्यक्रमाचे आयोजन

✒️आम्रपाली गाठले (शेगाव बू प्रतिनिधी)

 शेगाव बू (दि.20 फेब्रुवारी) :- भद्रवती तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम म्हणून नावारूपास आलेल्या चंदनखेडा ग्राम पंचायत वतीने शिव जयंती उत्सव मोठया थाटात साजरी करण्यात आला.छत्रपती क्रीडा मंडळ व गावातील युवक वर्गाच्या वतीने ग्राम सफाई करण्यात आली.

शिव जयंती च्या निमित्ताने गावातील थोर पुरुषांच्या पुतळ्याला सरपंच श्री नयन बाबाराव जांभूळ व उपसरपंच सौ भारती उरकांडे यांच्या हस्ते माल्यारपण तसेच पंचशील बौद्ध मंडळ यांच्या वतीने रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच सायंकाळी गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधीरभाऊ मुडेवार ग्रामपंचयत चे सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे उपसरपंच सौ भारती उरकांडे ग्राम विकास अधिकारी श्री के एस नाईकवार , ग्राम पंचायत सदस्य श्री निकेश भागवत श्री नाना बगडे , श्री बंडूजी निखाते सौ मुक्ता सोनूले सौ प्रतिभा दोहतरे सौ रंजना हनवते सौ श्वेता भोयर सौ सविता गायकवाड सौ आशा ननावरे व गावातील ग्रामस्थ तसेच युवक वर्ग व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते..

https://smitdigitalmedia.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here