कासारबेहळ येथे शिव जयंती उत्साहात साजरी

✒️ गजानन लांडगे महागाव (Yavatmal प्रतिनिधी)

महागाव (दि.19 फेब्रुवारी) :- यवतमाळ जिल्यातील महागाव तालुक्यात ग्रामपंच्यात कासारबेहळ सेवानगर येथे जगाच्या पाठीवर एकमेव राजा ज्यांच्या राज दरबारात स्त्रियांचा मान सन्मान करणारा परक्याच्या सुनेला माता समजणारा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कासारबेहळ(सेवानगर)ग्रामपंचायतच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून व पुष्पहार अर्पन करून जयंती साजरी करण्यात आली .

त्यावेळी माजी पंच्यायत समीती सदस्य तथा विद्यमान ग्रामपंच्यायत सदस्य मोहनराव कर्हे , अशोक पोलीस पार्टील ,शरद राठोड ,नंदकुमार मस्के वरोडी सोसायटी अध्यक्ष,विनायक मासाळकर , राजेंद्र पाटे , भिमराव मासाळकर , सतिस देवकते , राजरत्न हनवते ,प्रषीक बरडे संगणक परीचालक,दिलीप पिटलेवाड ग्रामपंच्यायत कर्मचारी हजर होते व त्यावेळे गोर सेनेचे तालुका अध्यक्ष आजेश जाधव यांनी आपले विचार मांडले .