उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन 

289

✒️वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.10 फेब्रुवारी ) :- मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.आज दिनांक ९ फरवरी २०२३ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी मा.माजी नगराध्यक्ष अहतेश अली साहेब अध्यक्ष तसैच माजी उपसभापती सौ संजीवनीताई भोयर उद्घाटक, , मा.डॉ.मूजनकर तालुका अधीकारी , मा.डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक,मा.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका, मंचावर उपस्थित होते.रिबिन कापुन कार्यक्रमातचे उद्घाटन सौ संजीवनी ताई भोयर याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून व महात्मा गांधी आणि डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरोग्य शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.मा.डाॅ .मूंजनकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले मा. भोयर ताई यांनी मार्गदर्शन केले गावपातळीवर असे कार्यक्रम व्हावे यांचे आवाहन केले.मा.डाॅ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक यांनी आरोग्य शिबीराचे महत्व पटवून दिले.मा श्री येडे साहेब यांनी सूत्रसंचालन केले मा.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी आभारप्रदर्शन केले .

हा कार्यक्रम ९ फरवरी ते ८ एप्रिल २०२३ पर्यंत चालणार आहे त्यासाठी जनतेने आरोग्य शिबीरामध्ये सहभागी होऊन लाभ या अभीयानाचा फायदा घ्यावा.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमांची सांगता केली.या कार्यक्रमासाठी श्रीमती कापटे श्रिमती कोडापे सौ पुसनाके,सौ कुमरे सौ मिना मोगरे,सौ सूजाता जूनघरे ,सोनल घाग,सपना राठोड,शैखर समूद्रे‌,लक्षमिकांत ताले, कूंदा यांनी मदत केली मेहनत घेतली. तसेच रक्तदान शिबीर राबविण्यात आले यासाठी श्री विक्की भगत श्री प्रदीप गायकवाड, श्री अभिनंदन यांनी सहभाग घेतला.