धनुर्विद्या विद्यार्थ्यासाठी महत्वाचा खेळ आहे..आमदार प्रतिभाताई धानोरकर    

✒️ वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 वरोरा (दि.28 जानेवारी) :- स्थानिक हिरालाल लोया विद्यालय व कनिष्ठ महा. वरोर येथे सत्र २०२२~२०२३ च्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन तालुका क्रीडा संकुल वरोरा येथे करण्यात आले. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन वरोरा~ भद्रावती विधानसभा मतदार शेत्राच्या आमदार सौ. प्रतिभा ताई धानोरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमात अधाक्षतानी हिरालाल लोया विद्यालय तथा कनिष्ठ महा. चे मुख्ध्यापक तथा प्राचार्य श्री. रविंकांत जोशी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भारत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी सदस्य कु. विमलताई बोरा, श्री. कृष्णकांतजी लोया, श्री. कमलकर्जी पावडे उपस्थित होते.

या सोबतच मंचावर विद्यालयाचे प्रवेशक श्री. परशराम पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. रजुभाऊ चिकरे यांची उपस्थिती होती. आपल्या उदयघटन भाषणात आमदार सौ. प्रतिभाताई यांनी विद्यार्थी जीवनात खेळांचे महत्व विशद केले. तसेच अशा प्रकारच्या आयोजन भव्य सौरुपात केल्याब्दल हिरालाल लोया विद्यालयाचे कौतुक केले. या प्रसंगी त्यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलीत केली तसेच धनुर्विद्या या खेळाचा वापर करून कार्यक्रमाचे उद्यघटन बान मारून अचूक नेम साधला.

कर्यकमाचे संचालन सौ. पोटे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सौ. कथलकर यांनी केले. या क्रीडा महोत्सवाला वर्ग ५ ते १२ चे जवळपास २५०० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी विद्यालय व कनिष्ठ महा. चे सर्व शिक्षक श्री राजू चिकटे ,श्री महेश डोंगरे ,श्री संजय बोंडे,सौ. संध्या धांडे,श्री बंडू कळसकर अध्यापक तथा अड्यापिक व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.