विद्यार्थ्यासाठी बाल आनंद मेळावा 

516

✒️मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)

वाघेडा (दि.18 जानेवारी) :- भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदनखेडा, पंचायत समिती भद्रावती येथे नुकतेच महिला पालकांचा हळदीकुंकू कार्यक्रम तथा बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला. 

विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते.स्टाॅलची मांडणी, विविध पदार्थाची विक्री, खरेदी व विविध पदार्थाचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.सकाळी मान्यवरांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटक . म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल कोकुळे हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा. उपसरपंच्या भारती उरकांडे प्रमुख पाहुणे मनिषा रोडे, साधना धाईत, अमृता कोकुळे, श्वेता भोयर, रंजना हनवते, प्रतिभा दोहतरे, हसिना कुळसंगे, उपस्थित होत्या .क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले.  

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करून विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगिकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा,या उद्देशाने दरवर्षी महिला पालकांचा हळदीकुंकू कार्यक्रम तथा बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाचे संचालन – अर्चना कुंभारे तर आभार भावना गुंडमवार यांनी केले.यशस्वितेसाठी शिक्षक लोंढे, मेश्राम,बोंढे, गायकवाड यांनी परिश्रम घेतले.