युवकाचा अपघातात जागीच मृत्यू

🔹वरोरा चिमूर महामार्गवर अपघाताची शृंखला कायमच

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू.(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.23 जून) :- वरोरा शेगाव चिमूर महामार्गावर आज दुपारच्या सुमारास अपघात झाला असून या अपघातात सुसा महालगाव येथील युवकाला अज्ञात ट्रक ने बेधडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला सदर ही शेगाव भेंडाळा अर्धवट असलेल्या रस्त्यावर अपघात झाला. यात युवक मृतक पंकज याचा जागीच मृत्यू झाला. 

         सविस्तर असे की वरोरा शेगाव चिमूर महामार्गाचे अनेक कामे अर्धवट असून या कच्या रस्त्यामुळे अनेक अपघात होत असते या रस्त्याचे काम एस आर के कांट्रक्षण कंपनी कडे सोपविली होते परंतु या कंपनीने अर्धवट कामाची पूर्तता करण्या करिता सदर के सी सी कंपनी कडे दिले परंतु ही कंपनी देखील हलगर्जी पणा करीत असून रस्ता बांधकाम करण्यासाठी विलंब करीत आहे या रस्त्यावर दररोज तसेच महिन्या खातिर दोन तीन छोटे मोठे अपघात नक्कीच होत असते .

आज देखील अपघात झाला असून अर्धवट रस्त्यावरून दुचाकी हळुवार चालत असता मागून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रक ने पंकज ला धडक देऊन पसार झाला. यात पंकज चा जागीच मृत्यू झाला मृतक पंकज बरडे राहणार सूसा महालगाव येथील रहिवासी असून काही कामा करिता तो बाहेर जात होता दरम्यान त्याचा अपघातात मृत्यू झाल्याने दुःख व्यक्त केले जात आहे.

तसेच रस्त्याचे काम करणाऱ्या के सी सी कंपनीवर कारवाई करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नागरिक करू लागले आहे. सदर या घटनेची माहिती शेगाव पोलीस स्टेशन ला मिळताच येथील प्रभारी ठाणेदार श्री महादेव सुरजुसे यांनी घटना स्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरणी तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले याच पुढील तपास येथील ठाणेदार श्री सुरजुसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी करीत आहे.