चिमुरात ‘ साप्ताहिक लोक प्रतिष्ठा’ व्रुत्तपत्राचा लोकार्पण सोहळा

✒️ नितीन पाटील (चिमूर प्रतिनिधी) :- 

चिमूर(दि.17 जानेवारी) :- चिमुर येथे साप्ताहिक लोक प्रतिष्ठा या व्रुत्तपत्राचा लोकार्पण सोहळा दि २२ जानेवारी २०२३ रोज रविवार ला आदर्श विद्यालय (बि.पी.एड.काँलेज )पिंपळनेरी रोड ,वडाळा (पैकु) येथे सकाळी ११.३० वाजता आयोजित केले आहे

 या साप्ताहिकाचे लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी मा.अँड.ज्ञानेश्वर नागदेवते ,सामाजिक कार्यकर्ता हे राहणार असुन कार्यक्रमाचे ऊद्घाटक म्हणुन गजानन भाऊ बुटके माजी जि.प.सदस्य यांच्या हस्ते होणार आहे.

 तर प्रमुख अतिथि म्हणुन चुन्नीलाल कुडवे अध्यक्ष चिमुर तालूका प्रेस असोसिएशन, रामदास हेमके तालूका अध्यक्ष व्हाईस आँफ ईंडिया चिमुर, सुरेश डांगे संपादक साप्ताहिक पुरोगामी संदेश चिमुर, प्रा.राजु रामटेके पत्रकार लोकमत समाचार, श्रीहरी ऊर्फ बाळुभाऊ सातपुते माजी तालुका प्रमुख शिवसेना चिमुर, नैताम सर मुख्याद्यापक आदर्श विद्यालय चीमुर हे उपस्थीत राहणार आहेत 

  तरी साप्ताहिक लोक प्रतिष्ठा या व्रुत्तपत्राच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थीत राहावे असे आवाहन मुख्य संपादक राम चिचपाले सर यांनी निमंत्रण पत्रकातुन कळविले आहे.