🔸डिजे फटाक्याच्या आतिषबाजीत व ढोल ताशांच्या गजरात शेगाव नगरी दुमदुमली
🔹शेगाव पोलिसांचा चोख बंदोबस्त
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.13 ऑक्टोबर) :- स्थानिक शेगाव बू येथे दरवर्षी मस्कऱ्या गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहाने होत असून येथील विसर्जन वरोरा तालुक्यातील प्रथम क्रमांकावर असून परिसरात विसर्जन करिता नामांकित आहे तेव्हा . विशेष म्हणजे शेगाव नगरी मध्ये ” मूर्ती लहान कीर्ती महान ” अशी परंपरा कायम आहे.
करिता प्रत्येक मस्कऱ्या गणेश मंडळांचा हजारो रुपयांचा खर्च असून सर्वाधिक आपला गणेश मंडळ सर्वाधिक सुशोभित कसा दिसेल या कडे प्रत्येक मंडळाचे अधिक लक्ष असते तेव्हा सर्वस्वी मंडळ डीजे , ढोल ताशे , फटाक्याची आतषबाजी , सुशोभित देखावे , अश्या अनेक उपक्रमाने शेगाव नगरी तसेच परिसरातील नागरिकांचे मने मोहून टाकतात.
त्यामुळे येथे परिसरातील अनेक गणेश भक्त शेगाव नगरी मध्ये दाखल होऊन या आनंदक्षणी सहभागी होतात. गणेश भाविक भक्ताच्या सुख सोई करिता अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी , मसाले भात , भोजन दान , यांची विशेष सोय उपलब्ध केली जात असते .
गणेश विसर्जन पाहण्याकरिता परिसरातील लाखो भाविक येत असल्याने या आनंदमय सुखमय क्षणी काही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी शेगाव येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात यांच्या ताफ्यासह सैनिक यांची मोठी चौका चौकात बंदोबस्त लावण्यात आला . या करिता शेगाव पोलीस तसेच शांतता कमेठी शेगाव तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठे सहकार्य केले.
यात मार्केटचा राजा मस्कऱ्या गणेश मंडळ शेगाव बू , ओम साई मस्कऱ्या गणेश मंडळ हनुमान वार्ड शेगाव , न्यू बाल गणेश मस्कऱ्या मठ वार्ड शेगाव , बाल गणेश मस्कऱ्या मंडळ कोटकर ले आऊट शेगाव , धूम मस्कऱ्या गणेश मंडळ इंदिरा नगर शेगाव तसेच अन्य एकूण १५ ते १६ छोट्या मोठ्या गणेश मंडळांनी यात सहभाग घेतला होता.
अखेर हे विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी गावकऱ्यांनी मोठे सहकार्य केले हे यात ग्रामपंचायत शेगाव , शेगाव पोलीस स्टेशन , शांतता कमेठी , तंटा मुक्त समिती , गावकरी तसेच राजकीय कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य करून मस्कऱ्या गणेश विसर्जन मोठ्या उत्साहाने व शांततेत पार पडला.
