शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडेसह शिवसैनिकांनी केला गणेश मंडळांचा स्वागत सत्कार 

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.13 ऑक्टोबर) :- स्थानिक शेगांव (बू) येथील मस्कऱ्या गणेश मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक काढून डी जे तसेच ढोल ताश्याच्या गजरात मस्कऱ्या गणपत्ती बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व गणेश मंडळाचे तसेच गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांचे स्वागत करण्यासाठी स्वागत मंच उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

स्थानिक शेगाव बू येथे दरवर्षी मस्कऱ्या गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या उत्साहाने थाटात होत असून येथील विसर्जन मिरवणूक वरोरा तालुक्यात प्रसिद्ध आहे. येथील प्रत्येक मस्कऱ्या गणेश मंडळांकडून आपले गणेश मंडळ सर्वाधिक सुशोभित कसा दिसेल या कडे प्रत्येक मंडळाचे अधिक लक्ष असते तेव्हा सर्वस्वी मंडळ डीजे , ढोल ताशे , फटाक्याची आतषबाजी , सुशोभित देखावे , अश्या अनेक उपक्रमाने शेगाव नगरी तसेच परिसरातील नागरिकांचे मने मोहून टाकतात.

या मिरवणुकीदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्यासह युवासैनिक तसेच शिवसैनिकांनी विसर्जन मिरवणुकीत सामील सर्व मस्कऱ्या गणेश मंडळ सदस्य व गानपत्ती बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांच्या स्वागत करण्यासाठी स्वागत मंच उभारण्यात आला होता. याप्रसंगी सर्व गणेश मंडळांचा शाल श्रीफळ तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी शेगाव येथील उपसरपंच साधना मानकर, उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड, युवा सेना जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव, विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, उपतालुकाप्रमुख राजू राऊत, युवा सेना तालुकाप्रमुख ओमकार लोंढे , शहर प्रमुख अक्षय झिले, विभाग प्रमुख रवी वाटकर.

होमराज घुमे, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल वाढई, कपिल राऊत, दादापूर ग्रामपंचायत सदस्य दिलीप बोधाने, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप चौधरी, उपशहर प्रमुख मनीष दोहतरे, अभी अभी रुयारकर, युवा सेना शहर प्रमुख अनिकेत हिवरे तथा समस्त युवा सैनिक , महिला आघाडी सदस्य, युवतीसेना सदस्य, आजी माजी पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.