✒️ शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
शेगाव बू (दि.13 जानेवारी) :-
2007 :- के .जी .बालकृष्णन यांनी भारताचे 37 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला
1996 :- पुणे मुंबई दरम्यान शताब्दी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी सुरू झाली
1967 :- पुण्यातील स.प महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.
1964 :- कोलकत्ता येथे झालेल्या मुस्लिम विरोधी दंग्यात 100 जण ठार.
1957 :- हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले.
1953 :- मार्शल टिटो युगोस्लाव्हींयांचे अध्यक्ष झाले.
1930 :- मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित .
1889 :- नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदोर येथे झाला.
1610 :- गॅलिलिओ यांनी गुरुचा चौथा उपग्रह कॅलिस्टोचा शोध लावला
1942 :- अमेरिकेने जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदीवासात पाठविण्यास सुरुवात केली.
