शिक्षणाचा वापर देशहितासाठी करायला हवा- दत्ता बोरेकर

✒️ वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

वरोरा (दि.12 जानेवारी) :- माणूस आयुष्यभर शिकतच असतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही ज्ञान त्याला मिळत असते वा ते तो प्राप्त करत असतो. अनेकदा आपल्याला मिळणारे ज्ञान, माहिती वा शिक्षण उथळ असू शकते. स्वामी विवेकानंदांनी खऱ्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे.

आपण घेत असलेल्या शिक्षणाचा वापर देशहितासाठी करायला हवा असे प्रतिपादन शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी उपसभापती पंचायत समिती वरोरा दत्ता बोरेकर यांनी खांबाडा येथे आयोजित श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल च्या वार्षिक स्नेह मिलन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना केले . 

    या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.आज (१२ जानेवारी ) खांबाडा येथे श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहमिलन संपन्न झाले. या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून शिवसेना तालुका प्रमुख दत्ता बोरेकर , कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष अंजु जोंगोनी तर प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून, सरपंच गणेश मडावी कोसरसार, उपसरपंच नलिनी थुटे , जेष्ठ पत्रकार अविनाश बन , संस्थेचे संचालक मारोती आसुटकर , सामाजिक कार्यकर्ते नितीन मायकरकार,विजय बालपांडे , प्रवीण कटाईत ,लक्ष्मण भोयर, शंभूलाल चौधरी , सुरेश गुळघाने , शेख इरफान ,शेखर जोंगोनी , कविता जोंगोनी , विनोद लोहकरे , अंकुश धोटे , शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षा मेश्राम इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते .  

 कार्यक्रमाची सुरवात माता सरस्वती ,राजमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आले .पुढे बोलतांना बोरेकर म्हणाले की, आज स्वामी विवेकानंद यांची व राजमाता जिजाऊ यांची जयंती . या मुहूर्तावर आपल्या शाळेतर्फे स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला हे विशेष कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून शिक्षण घ्यावे.

या गोष्टीला प्रारंभ केल्यास भारताला विश्वगुरु बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही . त्याच सोबत पालकांनी आणि मुख्यत्वेकरून या ठिकाणी उपस्थित महिलांनी राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन आपल्या पाल्यांवर संस्कार करावे असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका हर्षा मेश्राम यांनी केले तर प्रास्ताविक नितीन मायकरकार यांनी केले

 सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका भाग्यश्री माणूसमारे व नेहा बावणे यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शाळेतील शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले .