उपसरपंच पदी निखिल खोईजळ यांची निवड

264

🔹 गट ग्रामपंचायत सावरी (बिड) 

✒️ शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बू (दि.12 जानेवारी) :-आज दिनांक ११/०१/२०२३ बुधवार गट ग्रामपंचायत सावरी बिडकर येथे उपसरपंच निवडणूक घेण्यात आली . उपसरपंच पदी एक मताने निखिल खोईजळ यांची निवड करण्यात आली त्यावेळी लोकेश रामटेके सरपंच ग्रां पं सावरी बिडकर यांचे अध्यक्षतेखाली उपसरपंच पदांचे निवडणुक पार पडली.

या निवडणुकीत एकुण ९ सदस्यांनी भाग घेतला, त्यापैकी ७ सदस्यांनी हात वर करून मा निखील डोईजड यांची एकमताने उपसरपंच पदाची निवड केली. सदर उपसरपंच पदाच्या निवडणुकीत एकमात्र नामांकन निखील डोईजड यांचे असल्यामुळे निवडणुकीत चुरस उरलेली नव्हती. फक्त घोषणेची औपचारिकता उरली होती. दुपारी एक वाजताच निवडणुक अधिकारी नाग साहेब यांनी उपसरपंच निखील डोईजड यांचे नावाची घोषणा मा लोकेश रामटेके सरपंच सावरी अध्यक्षाच्या परवानगीने सर्वांसमोर घोषीत केले.

ग्रामसेवक मस्के साहेब यांनी निवडणुक प्रक्रीया योग्य रितीने पार पाडली व नवनिर्वाचित सदस्यांनी निवडणुक प्रकियेस अधिकारी वर्गास सहकार्य केले व निवडणुक प्रक्रिया झाली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुक पार पडली.