मनसे नेत्या शर्मिलाताई ठाकरे यांचे वरोरा आनंदवनचौक येथे जंगी स्वागत

🔹शेकडो मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनसे घोषणा देत महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले औक्षण

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.1 फेब्रुवारी) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या पत्नी तथा मनसे नेत्या शर्मिलाताई ठाकरे. मनसे महिला सेना राज्य उपाध्यक्षा रिटाताई गुप्ता या वणी येथील पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या “शिव महापुराण कथा”सप्ताह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज दिनांक 1 फेब्रुवारी ला वरोरा मार्गे जात असताना त्यांचे वरोरा येथील आनंदवन चौकात दुपारी 3.00 च्या दरम्यान मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जंगी स्वागत केले, यावेळी मनसे महिला सेनेच्या वरोरा तालुका अध्यक्षा रेवती इंगोले व इतर महिला पदाधिकारी यांनी मनसे नेत्या शर्मिलाताई ठाकरे व रिटाताई गुप्ता यांचे औक्षण करून ओवाळणी केली. दरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

वणी येथे पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या “शिव महापुराण कथा कार्यक्रमात प्रमुख उपास्थिती म्हणून शर्मिलाताई ठाकरे यांना पाचरण करण्यात आले होते. वरोरा भद्रावती या विधानसभा क्षेत्रात मनसेची ताकत अगोदरच आहे.

त्यात शर्मिलाताई ठाकरे यांची वरोरा येथे भेट म्हणजे कार्यकर्त्यांना एक प्रकारे ऊर्जा मिळाली असल्याची प्रतिक्रिया मनसे पदाधिकारी यांनी बोलून दाखवली या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी, महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष सुनील गुढे.

रमेश काळबांधे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आंनद बावणे,मनसे महिला सेना जिल्हा उपाध्यक्षा मंदा वरखडे, महिला सेना तालुका अध्यक्षा रेवती इंगोले, भद्रावती शहर अध्यक्षा विभा बेहरे, शुभांगी मोहरे, संगीता मेश्राम, विशाल देठे, मोहित हिवरकर, प्रशान्त बदकी, गजू वादाफळे, प्रतीक मुडे. राजेंद्र धाबेकर गजू वादाफळे, पवन ढोके, धनराज बाटबरवे, किशोर धोटे, सुनील पाझारे, प्रतीक मुडे इत्यादीनी केले आहे