मालवीय उच्च प्राथमिक शाळा नगरपरिषद वरोरा माता पालक गट सभा संपन्न

240

✒️वरोरा(विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.१२डिसेंबर):-भारत भूषण मालवीय उच्च प्राथमिक शाळा, नगरपरिषद वरोरा येथे निपुण भारत अभियाना अंतर्गत माता पालक गट सभा घेण्यात आली.

भारताच्या माजी पंतप्रधान प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या जयंती चे औचित्य साधून माता पालक गट सभा आयोजित करण्यात आली. या सभेला प्रथम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक श्री मंगेश ढगे सर व श्री सेलोकार सर तसेच नगरपरिषद वरोराचे प्रशासन अधिकारी श्री.दिलीप गिदेवार सर केंद्रप्रमुख श्री. राजू पिदूरकर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या माता पालक गटाच्या सभेला श्री. मंगेश ढगे सर यांनी आयडिया व्हिडिओ चे सादरीकरण मातांकडून करून घेतले . या सभेला सौ मधुवंती एनगंटीवार मॅडम व स्वाती दडमल मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले..