शेगाव (बु) येथे ग्राहक पंचायतची स्थापना, नविन कार्यकारिणी गठित

377

🔹शेगाव येथील गावकरी आणि विद्यार्थ्यांना ग्राहक कायदा विषयी केले मार्गदर्शन

✒️वरोरा,तालुका प्रतिनिधी(आशिष कोटकर)

🔸ग्राहक कायदा हा फक्त अभ्यासासाठी नाही तर सोशन मुक्त जीवन जगण्यासाठी आत्मसात करा – डॉ. नारायण मेहरे

वरोरा(दि.8डिसेंबर):-तालुक्यातील शेगाव (बु) येथे प्रत्येक वर्षी संत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो आणि या महोत्सवात समाज प्रबोधन केले जाते. यावर्षीही संत महोत्सव कार्यक्रम आयोजित केला आणि यावेळी ग्राहक मार्गदर्शन आणि प्रबोधन करण्याचे ठरवले. शेगाव हे गाव आजुबाजुच्या तिन तालुक्यातील मध्य भागातील आणि मोठ गाव आहे. गाव मोठे असल्यामुळे बाजारपेठ सुद्धा मोठी आहे. गत अनेक दिवसापासून ग्राहकांच्या समस्या समोर येत होत्या.

त्यामुळे ग्राहकांना, शेतकरी ग्राहकांना त्यांचे हक्क, अधिकार, न्याय मिळवुन देण्यासाठी ग्राहक पंचायत ची स्थापणा दि. ७ डिसेंबर ला करण्यात आली. ग्राहक पंचायत शेगाव (बु) ची कार्यकारिणीची घोषणा डॉ. नारायण मेहरे, विदर्भ प्रांत अध्यक्ष यांनी स्वतः केली. ग्राहक पंचायत, शेगाव (बु) चे अध्यक्ष म्हणून आशीष कोटकर, उपाध्यक्ष प्रमोद बोंदगुलवार, संघटक विनोद चिकटे, सचिव रविंद्र साखरकर, कोषाध्यक्ष सौ. मनिषा पटेल, विधी सल्लागार – ॲड. अजहर कुरेशी, प्रशिध्दी प्रमुख आशीष कोटकर तर कार्यकारी सदस्य म्हणून पुरूषोत्तम वैरागडे यांची नियुक्ती करण्यात आली.

विद्यार्थी, गावकरी, कार्यकर्ते यांना ग्राहक चळवळ, ग्राहक पंचायतीचे कार्य याबद्दल नितीन काकडे यांनी माहित दिली. तर ग्राहक संरक्षण कायदा २०१९, ग्राहकांचे हक्क, अधिकार याविषयी डॉ. नारायण मेहरे यांनी मार्गदर्शन केले. मेहरे यांनी विद्यार्थ्यांना संबंधितांना म्हणाले कि, ग्राहक कायदा हा फक्त अभ्यासासाठी नाही तर सोशन मुक्त जीवन जगण्यासाठी आत्मसात करा. पुरूषोत्तम मत्ते यांनी ग्राहक पंचायतीचे भद्रावती येथील सुरूवात आणि कार्याविषयी विस्तृत माहिती दिली.

कार्यक्रमाला वसंत वर्हाटे, गुलाब लोणारे, केशव मेश्राम, अशोक शेंडे, प्रविण चिमुरकर, सातपुते, मारगोनवार, राम चिचपाले, नेहरू विद्यालय शेगाव (बु), संत काशिनाथ महाराज कन्या विद्यालय, संताजी बहुउद्देशीय मंडळ, विनोद राऊत, विलास निखाते, रवींद्र साखर, किशोर कोटकर, पुरुषोत्तम वैरागडे, सतीश कोटकर, निवृत्ती दाढे तसेच कन्या विद्यालय शिक्षक वृंद तथा नेहरू विद्यालय शिक्षक वृंद आणि गावातील नागरिक उपस्थित होते….

न्यूज पोर्टलला शासनमान्यता!