१ किलो ३०० ग्राम गांजा जप्त आरोपी फरार

🔸स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.29 जानेवारी) : – येथील हनुमान वॉर्डात पोलिसांनी धाड टाकून १ किलो ३०० ग्रॅम गांजा जप्त केला. आरोपी फरार असून पोलीस आरोपी शोध घेत आहेत. हनुमान वॉर्डातील संघपाल उर्फ संग्राम लभाने (४६) याच्या घरी विक्रीसाठी गांजा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्या आधारावर वरोरा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. यात रसिका संघपाल उर्फ संग्राम लभाने (३६) व संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाने (४६) हे मनोव्यापारावर परिणाम करणारा घटक असलेला ओलसर कॅनॉबिस/गांजा वनस्पतीचे पाने, फुले व बियांची विक्री करण्याकरिता १.३०० किलोग्रॅम साठा करून ठेवल्याचे आढळून आले.

याप्रकरणी आरोपीवर एनडीपीएस ऍक्ट १९८५ मधील कलम ८ (क), २० (ब) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच संघपाल लभाने हा फरार झाला. पोलिस त्याच्या शोधात आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, साहाय्यक पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजिंक्य तांबडे,

साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक दीपक ठाकरे, पोलीस हवालदार दिलीप सूर, मोहन निशाद, मनोज ठाकरे, तेजस्विनी गारघाटे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, स्वामिदास चालेकर, धनराज करकाडे, नितीन कुरेकर, प्रशांत नागोसे, प्रशांत बदामवार यांनी केली.