डुप्लिकेट सोन्याच्या पाटल्या पतसंस्थेत गहाण ठेवणारे राकेट यवतमाळ जिल्ह्यात सक्रिय

🔸सोन्याचा लेप लावलेल्या पाटल्या पतसंस्थेत गहाण ठेवत लाखोंचे कर्ज उचल करणारे आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार 

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि .20 ऑगस्ट) :– तालुक्यांत आणि आर्णी तालुक्यातील पतसंस्थेमध्ये डुबलीकेट सोन्याच्या पाटल्या गहाण ठेवणारी सोलापूरची टोळी सक्रिय झाली असल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. तालुक्यातील एखाद्या व्यक्तीची पतसंस्थेत सोने गहाण ठेवण्यासाठी खाते उघडण्यासाठी ओळख घेतली जाते. सोलापूर येथील बनावट सोन्याचे दागिने पतसंस्थेत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गहाण ठेवून लाखोंचे कर्ज उचलण्याच्या नावावर गंडा घालण्यात आला. त्यामुळे महागाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

काल मंगळवारी सायंकाळी महागावात बनावट सोन्याच्या पाटल्याचा विषयी कुजबूज सुरू झाली. सोन्याचा लेप लावलेल्या पाटल्या तयार करून पतसंस्थेत गहाण ठेवणारी टोळी यवतमाळ जिल्ह्यात सक्रिय झाली आहे. सदर बनावट सोन्यावर डुप्लिकेट हॉलमार्क नंबर देऊन पाटल्या तयार केल्या जात आहे. अशीच एक घटना महागाव शहरामध्ये मंगळवारी मध्ये घडली.

महागाव तालुक्यातील भोसा येथील एका व्यक्तीने शहरातील एका पतसंस्थेत सोन्याच्या हुबेहूब वाटणाऱ्या बनावट पाटल्या गहाण ठेवण्यासाठी आणलेल्या असतांना पतसंस्थेने नेमलेल्या सुवर्णकाराकडे पाठवुन सोन्याचे व्हॅल्युएशन काढण्यासाठी नेले असतांना पाटल्या तोडून तपासणी अंती बनावट असल्याचे सुवर्णकाराच्या लक्षात आले. त्या मुळे या बनावट सोन्याच्या पाटल्यांचा संशय बळावला. या टोळीने यवतमाळ जिल्ह्यात इतर ठिकाणी तसेच आर्णी येथेही पतसंस्थे मध्ये पाटल्या गहाण ठेवून लाखोंच्या रकमा कर्ज स्वरूपात उचल केल्या असल्याचे समजते. जिल्ह्यातील अनेक पतसंस्थांना या टोळीने टार्गेट केले आहे. त्या पाटल्यावर हुबेहूब बनावट हॉलमार्क नंबर टाकलेला असल्यामुळे सुवर्णकार व्यापाऱ्यांची दिशाभूल होत आहे. त्या मुळे सोनारांनी सोने तोडून पाहावे.

महागाव येथील एका सुवर्णकार दुकानात पडताळणी करतांना डुप्लिकेट पाटल्या असल्याचे निर्देशनास आल्याची दबक्या आवाजात कुजबुज चालू झाली,त्या मुळे एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील जनतेने तसेच सुवर्णकार व्यापाऱ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक झाले आहे. लवकरच दोन व्यक्तीवर पोलिसांत गुन्हे दाखल होणार असल्याचे कळते. या पूर्वी नेर येथील कर्मचारी असल्याचे सांगून डुप्लिकेट अंगठ्या सोनाराकडे गहाण ठेवल्या होत्या, त्या व्यक्तींवर महागाव पोलीस स्टेशन येथे कार्यवाही झाली आहे.

महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी जनतेला आणि व्यापाऱ्यांना आव्हान केले. अनोळखी व्यक्तीद्वारे संशयास्पद सोने गहाण ठेवत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, जेणेकरून कुणाची फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी‌. त्या व्यक्तींनी घेतलेले सोन्याचे बिल तपासत जनतेने या बाबत जागृत राहण्याची गरज आहे.