🔹ऋतुजा कदम, प्रगती कदम, अभिषेक काळे या विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार
✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon प्रतिनिधी)
महागाव (दि.11 ऑगस्ट) :-
मराठा सेवा संघ ही सामाजिक संघटना महागाव शहरातील व महागाव तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शासकीय नोकरी लागलेल्यांचा सत्कार, वृक्षारोपण, गरजूंना मदत असे अनेक उपक्रम राबवीत असतात. 10 ऑगस्ट रोजी महागाव शहराची मान उंचावणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रसंगी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
या मध्ये महागाव येथील कु. ऋतुजा दतराव कदम हीची महावितरण मध्ये विद्युत सहायक पदी निवड झाली आहे. तर कु.प्रगती रमेश कदम या विद्यार्थिनीची वैद्यकीय क्षेत्रातील बी.ए.एम.एस. ही पदवी मिळवत ती डॉक्टर झाली. तसेच अभिषेक विष्णू काळे या विद्यार्थ्यांची सहाय्यक इन्कमटॅक्स ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. तीनही विद्यार्थ्यांनी हलकीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेत यश संपादन केले आहे.
बद्दल मराठा सेवा संघ महागाव तालुका यांच्यावतीने विद्यार्थी आणि पालकांचा मराठा सेवा संघाची शिवधर्म दिनदर्शिका, प्रशस्तीपत्र,शाल, पुष्पगुच्छ व पेढे देऊन यथोचित सन्मान करीत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार समारंभासाठी उदय नरवाडे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष, पंकज देशमुख मराठा सेवा संघ तालुका सचिव, डॉ.संदीप शिंदे मराठा सेवा संघ जिल्हा सचिव, शैलेश कोपरकर काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष तथा गटनेते नगरपंचायत महागाव, सामाजिक कार्यकर्ते प्रतीक पाटील नरवाडे, बाळू पाटील नरवाडे, मराठा सेवा संघाचे संघटक मंचकराव कदम, सदस्य चतुर्वेद अडकिने, शिक्षक रवी भांगे यांचे सह इतर कार्यकर्ते या छोटेखानी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.







