✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon प्रतिनिधी)
महागाव(दि.4 ऑगस्ट) :- महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी उमरखेड, तहसीलदार महागाव यांच्या मार्गदर्शनात 3 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहा अंतर्गत विविध ठिकाणी पांदण रस्त्याच्या दोन्ही कडेला वृक्षारोपण करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे आणि तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार अभय मस्के यांच्या मार्गदर्शनमध्ये रविवारी महसूल सप्ताह अंतर्गत पिंपळगाव (इजारा) येथील महादेव मंदिर ते वाघाई मंदिर पांदण रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्यात आले. पिंपळगाव ईजारा च्या सरपंच हर्षा मस्के यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सदर वृक्षारोपण कार्यक्रम मंडळ अधिकारी फुलसावंगी राम पंडित, ग्राम महसूल अधिकारी प्रज्ञा लव्हाळे, भूमी अभिलेख कार्यालयाचे स्वामी, महसूल सेवक विजय पोटे यांचे सह गावातील सुरेश जंगले, दिलीप पोटे, सुरेश कुरकुटे, पुंडलिक जंगले, विठ्ठल खंदारे, सुनील टिपरे, अविनाश वायकुळे, शिवा बडगे, पवन जंगले, सोनू बर्डे यांचेसह चिल्ली( ई.)येथे सरपंच अनिल कोकणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमाला मंडळ अधिकारी फुलसावंगी राम पंडित, ग्राम महसुल अधिकारी सदानंद भुरके, महसुल सेवक नितीन देवसरकर, भूमी अभिलेखचे परमार्थ ठोके, गावातील प्रतिष्ठित नागरीक प्रेम मुडे , संतोष जाधव, रमेश राठोड, विजय आडे यांची यावेळी उपस्थिती होती.
कासारबेहळ येथे पोलिस पाटील अशोकराव कऱ्हे, तंटा मुक्ति अध्यक्ष मधूकर कऱ्हे, वरोडी सोसायटी अध्यक्ष नंदकुमार मस्के यांच्या हस्ते झाला असून सदर कार्यक्रमाला मंडळ अधिकारी महागाव राम पंडित, ग्राम महसुल अधिकारी अनिल खडसे, भूमी अभिलेख कार्यालयाचे राठोड, महसूल सेवक प्रवीण वाहुळे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक शंकर गाढवे, प्रशिक बर्डे, राहुल लोंढे, ओमकार पाटे,शिवम कवाने, पांडुरंग बावणे उपस्थित होते. महागाव येथे ग्राम महसुल अधिकारी दीपक दिवेकर, महसुल सेवक शंकर चव्हाण, उप -अधीक्षक भूमी अभिलेख कलावती जाधव मॅडम व वरखडे हे हजर होते.







