🔸न .प. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी देशी दारू दुकानाची एनओसी अखेर रद्द

✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon प्रतिनिधी)
महागाव(दि.1 ऑगस्ट) :-
महागाव प्रभात क्र. 1 मध्ये देशी दारू विक्री करीता न. प. प्रभारी मुख्याधिकारी यांनी 28 एप्रिल 2025 रोजी शुभम बाबूलाल जयस्वाल यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर महागाव नगरपंचायत मध्ये मोठ्या घडामोडी झाल्या.
सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करत एकत्र येऊन सर्व नगरसेवकांनी मिळून 24 जुलै रोजी सर्वसाधारण घेतली. त्यामध्ये सर्वानुमते देशी दारू दुकानाला दिलेला ठराव व नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. असा ठराव पास झाला व त्यानंतर मुख्याधिकारी यांनी दिलेली एनओसी रद्द नकेल्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांना दोन दिवस आमरण उपोषण करावे लागले. दुसऱ्या दिवशी 1ऑगस्ट रोजी प्रभाग क्र.1 मधील नागरिकांनी उपोषणकर्त्यांना पाठिंबा देऊन स्व. वसंतराव नाईक चौकामध्ये देशी दारूचे दुकान सुरू होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेऊन आंदोलन केले, त्या मुळे एनओसी रद्द झाल्याने रास्तारोको आंदोलनाला अखेर यश आले.
वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यालगत होत असलेल्या देशी दारू दुकानाला विरोध करण्यासाठी बंजारा समाज एक वाटला होता. बंजारा समाजाचे कार्यकर्ते यांनी यावेळी मोठा सहभाग नोंदविला. या वेळी डॉ.पंजाब राठोड,आत्माराम राठोड, एड.डी.बी. नाईक, डॉ. ज्ञानदेव भेंडे, विलास गावंडे, राजू नरवाडे, राजू भरवाडे व इतर कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करून उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला त्यामुळे उपोषणकर्त्याचे उपोषणाला बळ मिळाले.
28 एप्रिल रोजी देशीदारू विक्री करिता दिलेली एनओसी रद्द केल्याचे पत्र रस्ता रोको करणाऱ्या नागरिकांना, उपोषणकर्त्या सत्ताधारी नगरसेवकांना व राज्य उत्पादन शुक्ल निरीक्षक पुसद यांना पत्र देऊन यापूर्वी दिलेली एन.ओ.सी.रद्द केली असून पुढील कार्यवाही करावी करिता लेखी पत्र न.प. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यामुळे रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. उपोषणकर्त्या सत्ताधारी पक्षाच्या नगराध्यक्षा, उपाध्यक्ष व नगरसेवकांनी आपले उपोषण मागे घेतले.
विरुद्ध पक्षाचे नेते भारतीय जनता पार्टीचे रामराव पाटील, सुरेश नरवाडे व इतर नगरसेवक यांनी बहुमताने ठराव पास केल्यामुळे सत्ताधारी पक्षांनी उपोषण करण्यासाठी आम्हाला विचारले नसल्यामुळे आम्ही उपोषण मंडपात सहभाग घेतला नसून आमचा दारू दुकानाला पूर्णपणे विरोध असून या पूर्वी दिलेल्या बोगस ठराव याबाबत सखोल चौकशी करून पोलिसांनी कार्यवाही करावी असे मत व्यक्त केले.







