🔹आसाळा गावांमध्ये कृषी दूतांनी केले माती परीक्षण
✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.18 जून) :- आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील सातव्या सत्रातील विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव प्रशिक्षण अंतर्गत यशस्वीरित्या विविध प्रयोग पार पाडत आहेत प्रामुख्याने मत्स्य व्यवसाय,दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन,सेंद्रिय शेती,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पेरणीपूर्व मशागत पिकांवरील कीड नियंत्रण आणि शाश्वत शेती या विविध उपक्रमांतर्गत गावामध्ये जनजागृतीचे धडे दिले,जात आहेत. यामध्ये माती परीक्षण हा महत्त्वाचा मुद्दा असून याकडे खूप शेतकऱ्यांचं दुर्लक्ष आहे त्यामुळेच उत्पादन क्षमता दिवसेंदिवस घटत आहे व मातीची सुपीकता कमी होत आहे यावर उपाय म्हणून कृषी दुतांनी आसाळा या गावांमध्ये माती परीक्षण बद्दल माहिती सांगितली व जनजागृती ही केली.
त्यामध्येच त्यांनी प्रात्यक्षिक ही करून दाखवले दरम्यान विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सतीशजी गायकवाड यांच्या शेतामध्ये जाऊन मातीचे नमुने गोळा केले व तपासणी करिता महाविद्यालयामध्ये पाठवले यामध्ये कृषी दूध राज दसोरा,गोपाळ मसलकर,अथर्व महल्ले,साहिल कंदुकवार,वैभव जनबंधू,शिवराज डुकरे,भूषण गानफाडे यांचा सहभाग असून मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राचार्य डॉ .सुहासजी पोतदार सर व विषय विशेष तज्ञ सौ.पल्लवी उरकुडे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.







