माना जमातीच्या गुणवंत तथा समाजभूषण व्यक्तीचा गुणगौरव व सत्कार सोहळा

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.16 जून) :- 

दिनांक १५/०६/२०२५ रोज रविवारला माना आदिम जमात मंडळ मुंबई तालुका शाखा वरोराच्या वतीने संत तुकडोजी विद्यालय तह कनिष्ट महाविद्यालय माना जमातीतील इयता १० वी व १२ वी मधून तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध शाळा महाविद्यालयातून प्रविण्याश्रेणी प्राप्त विद्यार्थांना तसेच आदिम समाजातील कला ,किडा , साहित्य , कृषी व स्पर्धा परीक्षेतील उल्लेखनीय कामगिरी करणाचा माना जमातीच्या व्यक्तीचा गुणगौरव व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला .

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुधाकर सोनवणे मा. आ. ज. मं. मुंबई केद्रीय शाखेचे अध्यक्ष लाभले उद्घाटक म्हणून Dr. रमेशकुमार गजभे माजी राज्यमंत्री (म.रा ) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले . या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. आ. ज. मं. मुंबई ची कार्यकारणी सदस्य श्री .अरविंद दडमल ,,श्री.श्रीकृष्ण नन्नावरे ,श्री. भास्करराव गायकवाड ,श्री. केशवराव बारेकर श्री. विजय घरत, श्री. गुणवंत दडमल , श्री .हरिदास श्रीरामे उपस्थित होते सदर कार्यक्रम एकूण ४५ गुणवंत विद्यार्थी ,समाजभूषण व्यक्तीचा गुणगौरव तथा सत्कार करण्यात आला .

तालुका कार्यकारणी अध्यक्ष श्री.रामशोक दडमल ,उपाध्यक्ष यशवंत घोडमारे तथा सदस्य गण दागेश श्रीरामे ,प्रभाकर वाघ ,गुलाब श्रीरामे ,शंकर दडमल ,दादाजी दडमल ,सीमाताई घोडमारे , पार्ढोवताबाई ढोक .यांचे श्रेय लाभले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शिरिष दडमल यांनी केले तर आभार श्री .विनोद खडसंग यांनी मानले ग्रामीण विद्यार्थ्यांना क्रेदीय मंडळ मुंबई च्या सर्व मार्गदर्शक अतिथीचे मार्गदर्शन लाभले .