पांढरतळा येथे कृषीदूतांचे आगमन

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.11 जून) :- 

9 जून सोमवार ला पांढरतळा तालुका,वरोरा येथे आनंद निकेतन कृषि महाविदयालय आनंदवन वरोरा अंतिम वर्षाचे विद्यार्थी ग्रामिण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक सलग्नक पांढरतळा येथे दाखल झाले असून ग्रामपंचायती च्या वतिने त्यांचे स्वागत करण्यात आले.

यामध्ये कृषीदूत पियुष इंगोले, नाद घोडे , विठ्ठल जाधव, अंकुश बन्नोरे, रितेश भेंडारे, अनिकेत जरे, उवेस पटेल यांचा समावेश असुन हे तीन महिने शेतकयांना मार्गदर्शन करणार आहे. शेतकऱ्यांन साठी विविध कार्यक्रम व प्रात्यक्षिके दाखविणार आहे. त्यात माती परीक्षण, विविध पिकांचे लागवड तंत्रज्ञान, पिकावरती येणारे रोग व किड माहिती व व्यवस्थापन. जनावराची काळजी, बिजप्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. या प्रसंगी सरपंच श्री. शंकर दडमल व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोदार, डॉ. रामचंद्र. महाजन डॉ. स्वप्निल पंचभाई, श्री नितिन गजबे व इतर शिक्षक रुंदाचे मार्गदर्शन प्राप्त झाले.