🔹कोट्यवधीचे साहित्य जळून खाक
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.1 मे) :- नागभीड तालुक्यातील गिरगाव येथील किराणा दुकान व तुलसी मसाला गृह उद्योग व्यवसायिक अमोल पब्बतवार यांचे भरवस्तीत असणाऱ्या तुलसी मसाला उद्योग या गोडाऊनला रात्रीच्या वेळेस घरी कोणी नसताना आग लागून कोट्यवधीचे मसाला साहित्य जळून खाक झाले असून कोट्यावधीचे नुकसान झाल्याचे समजते.
नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे भरवस्तीत अमोल पब्बतवार यांचे तुलसी ट्रेडर्स मसाला व गृह उद्योगाची मशिनरी व दोन मजली असलेल्या कौलारू मकान
आहे आणि समोर किराणा दुकान आहे गोडाऊन मध्ये असलेले किराणा व मसाला करण्यासाठी लागणारे साहित्य त्यात गृह उद्योग मसाला, कंपनीचे मसाला पॅकिंग पिशव्या, पेकिंग प्लास्टिक , मसाला करण्यासाठी लागणारा कच्चा माल, जनरल साहित्य ,100. टीन खाद्यतेल , 20 क्विंटल साखर व संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले त्यात जवळपास 1. कोटी 25 . लाख रुपयाचे नुकसान झाले
त्यांचे संपूर्ण कुटुंब 29 .एप्रिलला चंद्रपूरला होते त्याच रात्री 1. ते 2. चे दरम्यान कौलारू गोडाऊन असल्याने वरून धुवा निघत असल्याचे लक्षात आले . त्यानंतर आरडा- ओरड झाली संपूर्ण गाव जागा झाला व आग नियंत्रणा आणण्यास मदत झाली यावेळी सिंदेवाही व नागभिड येथील नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तात्काळ पोहोचल्याने आग नियंत्रणात मदत झाली.







