शार्ट सर्किटमुळे लागलेला आगीमुळे शेतकऱ्यांचे शेती उपयोगी साहित्य जळून खाक

🔹सहाय्यक अभियंता रामटेके यांनी केला घटना स्थळाचा पंचनामा

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon bu प्रतिनिधी) 

शेगाव बू (दि.26 एप्रिल) :- तालुक्यात येत असलेल्या पारडी येथे बुधवार ला दुपारच्या सुमारास शेतात असलेल्या एम एस ई बी ची थ्री फेज डीपी मध्ये अचानक शार्ट सर्किट होऊन जवळपास असलेल्या गवतात ठिणगीने आग लागली या आगीत शेती उपयोगी साहित्य जडाळे असून लाखो रुपये नुकसान झाले.

महावितरण कार्यालय चारगाव बु अंतर्गत येत असलेल्या पारडी गावातील शेतकरी देवेंद्र मेश्राम यांच्या शेतात थ्री फेज लाईनची मोठी डीपी असून त्यामध्ये शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत शेती उपयोगी 70 ते 80 पाईप, वायर इतर साहित्य जळून नुकसान झाले शॉर्ट सर्किटमुळे आग लागली नागरिकांना दिसतात जवळपास असलेल्या नागरिकांनी शेतीकडे धावत आग विजवली या मध्ये शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले असून या शेतकऱ्याला शासन कडून आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील शेतकरी करू लागले आहेत.

आग लागल्याची माहिती चारगाव बु. येथील सहाय्यक अभियंता रामटेके यांना मिळतात घटनास्थळी जाऊन घटना पंचनामा करण्यात आला आहे,यावेळी लाईनमन वैशाली गहुकर,सूर्यभान चुधरी गावातील नागरिक उपस्थित होते.