✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.3 जानेवारी) :- भद्रावती तालुक्यातील शेगाव खुर्द येथे दि. २७ ते २९ डिसेंबर ला तीन दिवसीय माना आदिम जमात मंडळ शेगाव (खु) तर्फे नागदिवाळी मोहात्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये २७ ला सकाळी ग्रामसफाई करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्या नंतर माना समाज प्रथे नुसार मूठ पूजन करून समाज जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. नंतर दि. २८ डिसेंबर ला रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.
त्या नंतर समाजाला समाजाच्या इतिहासाबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून सुधाकर रोहनकर (वरोरा ), संदीप घरत (पारोधी ), हरिदास श्रीरामे ( चंद्रपूर ), सरपंच मोहित लाभाने, आदी उपस्थित होते. संदीप घरत यांनी माना समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकला तसेच बाबासाहेबांनी लिहलेल्या राज्य घटने बद्दल माहिती दिली. तर सुधाकर रोहनकर यांनी समाजातील तरुणांनी समोर येऊन समाजासाठी काही तरी करावे असे संगितले व समाजासाठी काम करणाऱ्या २० कार्यकर्त्यांना विरंगना मुक्ताई च्या प्रतिमा भेट म्हणून दिल्या.
त्या नंतर सम्पूर्ण गावातून शोभा यात्रा काढण्यात आली. या मध्ये पुरुष व स्त्रियांनी तसेच मुला व मुलींनी पारंपरिक पोशाख परिधान केले होते. व त्यांनी गोंडी व इतर गाण्यावर संपूर्ण रस्ताभर नृत्य सादर केले. या शोभा यात्रेत गावातील चौकात मसालाभात तसेच चहा वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. त्या नंतर तिसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले व सायंकाळी पूर्ण गावाला भोजणाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यकामाचे पार पडण्यासाठी माना आदिम जमात मंडळ चे अध्यक्ष संजय नन्नावरे, सचिव सूर्यभान नन्नावरे, उपाध्यक्ष मंगेश जिवतोडे, छत्रपती गणेश मंडळ चे सदस्य तथा एकटा क्रिकेट क्लब चे सदस्य व समाजातील युवा कार्यकते यांनी केले. तसेच समस्त गावकरी यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रियांका गायकवाड यांनी केले व प्रास्ताविक मंगेश नन्नावरे यांनी केले. आभार प्रदर्शन उषा जिवतोडे यांनी केले.