🔸कर्मचाऱ्याची पिळवणूक थांबवा.. प्रहार ची मागणी

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.21 डिसेंबर) :- नगरपरिषद भद्रावती येथील कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सेवेत रुजू आहेत परंतु त्यांना कसल्याही प्रकारचा शासकीय लाभ मोबदला तसेच त्यांना वेतन सुद्धा पुरेशी मिळत नाही शिवाय शासनाने किमान वेतन लागू केली असून सुद्धा देखील त्यांना मजुरी याच नावाखाली वेतन दिली जाते.
तर त्यांना 6000 ते 8000 इतकी रक्कम मासिक महिना म्हणून दिला जातो यासोबत त्यांना शासकीय योजना या सुद्धा दिल्या जात नाहीत त्यामुळे येथे असलेले 150 पेक्षा अधिक कामगार कर्मचारी हे अनेक शासकीय योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे येतील नगरपरिषद कर्मचाऱ्यांची सर्रासपणे मिळवणूक होत असून ही मिळवणूक खपवून घेणार नाही करिता प्रहारजन पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री शेरखान पठाण यांनी जिल्हाधिकारी तसेच कामगार आयुक्त चंद्रपूर यांना निवेदनातून कळविले आहे.
येथील कामगार कर्मचारी यांनी वरिष्ठ अधिकारी माननीय श्री मुख्याधिकारी यांना याबाबत वेतन बाबत विचारणा केली असता ते उद्धट बोलतात शिवाय काम करायची असेल तर करा अन्यथा सोडून द्या अशा अपव्य भाषेत संभाषण करतात त्यामुळे येथील कामगारांची कर्मचाऱ्यांची मने दुखावतात कंत्राटदार कर्मचारी हा अत्यंत गरीब असून मिळेल त्या रकमेमध्ये आपल्या कुटुंबाची तसेच स्वतःची पालन पोषण करीत आहे.
शिवाय त्यांचा चार महिने पाच महिने पगार होत नाही त्यामुळे त्यांना आपले कुटुंब चालवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे शिवाय उसणवाडी करून कर्जबाजारी होऊन कुटुंबाला हातभार लावावा लागतो त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळ देखील अनेकदा आली आहे शिवाय भविष्यामध्ये येत असते तेव्हा या गरीब कर्मचाऱ्यांचा भविष्याचा तसेच कुटुंबाचा विचार लक्षात घेऊन त्यांच्या पगारांमध्ये शासकीय योजनेप्रमाणे पगारात वाढ देण्यात यावी शासकीय सुख सोयी देण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर यांच्याकडून केली जात आहे .






