शेगाव ग्राम पंचायत तर्फे पडदे व चटई चे वितरण 

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.20 सप्टेंबर) :- स्थानिक शेगाव बूज येथे आज ग्राम पंचायत कार्यालय शेगाव बूज तर्फे सांस्कृतिक कार्यक्रम ,तसेच सामाजिक कार्यक्रम , धार्मिक कार्यक्रम प्रसंगी उपयोगात येणाऱ्या मंडप करिता लागणारे पडदे तसेच गिरवी चटई चे वितरण करण्यात आले.

सर्व धर्म समभावत जोपासून गावात असलेल्या सर्व धर्माच्या लोकांना विविध धार्मिक , सामाजिक , सांस्कृतिक , तसेच वय्यक्तिक कार्यक्रमासाठी उपयोगात येत असलेले साहित्य हक्काचे प्राप्त व्हावे या करिता तसेच गोर गरीब बांधवांना वेळी वेळी कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य मंडप चे पडदे तसेच गिरवी चटई ग्राम पंचायत शेगाव कडून देण्यात आली.

सदर हे साहित्य ग्राम पंचायत शेगाव चे सरपंच श्री सिद्धार्थ पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी.माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य श्री यशवंत लोडे , ग्राम पंचायत सदस्य श्री प्रफुल वाढई , आशा वर्कर सौ . लताताई वैद्य व गावातील नागरिक तसेच ग्राम पंचायत चे कर्मचारी उपस्थित होते.