✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)
वरोरा(दि.20 सप्टेंबर) :- महावाचन उपक्रमा अंतर्गत दिनांक 19.9.24 रोज गुरुवार ला आनंद निकेतन महाविद्यालय आणि पंचायत समिती वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यां मध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, पुस्तके विद्यार्थ्यांचे मित्र व्हावेत आणि वाचन कला वृध्दींगत व्हावी या हेतूने महावाचन उपक्रमा अंतर्गत ग्रंथ प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले.
प्रदर्शनाचे अध्यक्ष महविद्यालायचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे सर,उद्घाटक गटशिक्षणाधिकारी चहारे सर, मार्गदर्शक ग्रंथपाल डॉ. संजय साबळे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य राधा सवाने, माजी विस्तार राऊत, केंद्रप्रमुख श्रीमती चिडे, श्रीमती नौकरकर उपस्थित होते . वरोऱ्यातील विविध शाळांतील 102 विद्यार्थी व त्यांचे शिक्षक या कार्यक्रमात सहभागी झाले.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन श्री. मारोती मुंडे सरांनी केले .ग्रंथ प्रदर्शनी करिता ग्रंथालयातील कर्मचारी श्री. चिमुरकर, श्री शिर्के,श्री.थुटे, श्री साखरे व मगरे बाई यांचे विशेष सहकार्य लाभले.






