मोटेगाव येथील आपद्ग्रस्तांना उपचाराकरिता आमदार बंटी भांगडिया यांची आर्थिक मदत

✒️शुभम गजभिये चिमूर (Chimur प्रतिनिधी)

चिमूर(दि .9 ऑगस्ट) :- चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथील रहिवाशी वंदना अरुण दडमल हिचे मेंदूला मार लागल्या मुळे औषधोपचार करीता आर्थीक मदत दिले. सिद्धार्थ मोतीराम गेडाम यांचे हाताचे हाड मोडले औषधोपचार करीता आर्थीक मदत दिले. राजू दडमल यांचे हात फॅक्चर झाल्याने औषधोपचार करीता आर्थिक मदत दिले. वरील आपद्ग्रस्तांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने उपचाराचा खर्च कसा करायचा हा प्रश्न कुटुंबियासमोर निर्माण झाला.

कुटुंबीयांनी स्थानिक भाजप पदाधिकारी मार्फत आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र यांना उपचार करिता आर्थिक मदतीची मागणी केली असता. आ.बंटी भांगडिया यांनी कोणताही विचार न करता भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे यांच्या मार्गदर्शनात आर्थीक मदत घरपोच पाठवून दिली.