आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांचे रावे कार्यक्रमांतर्गत खेमजई गावात आगमन

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.1 जून) :- खेमजई ग्रामीण भागातील शेती, शेतकरी जीवन आणि कृषी विस्तार कार्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा येथील अंतिम वर्ष बी.एस्सी. (कृषी) विद्यार्थ्यांचे ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत खेमजई गावात आगमन झाले. विद्यार्थ्यांचे ग्रामस्थ, शेतकरी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी गावच्या सरपंचा श्रीमती. मनिषाताई चौधरी, उपसरपंच श्री चंद्रहास मोरे, म.गा. तंटामुक समिती अध्यक्ष शंकर धोत्रे, तसेच पशुचिकित्षक डॉ गोपाल राठोड, ज्येष्ठ नागरिक शिवराय निब्रड तसेच गावकरी यांच्यातर्फे उत्साहपूर्ण वातावरणात कृषी दूतांचे स्वागत केले .

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी पुढील काही आठवडे गावात राहून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. तसेच शेतीतील विविध पिकांची स्थिती, कृषी समस्या, शासकीय योजना, पशुपालन, जलव्यवस्थापन आणि कृषीपूरक उद्योगांचा अभ्यास करणार आहेत. यासोबतच शेतकरी मेळावे, कृषी जनजागृती कार्यक्रम, प्रात्यक्षिके आणि सर्वेक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पोतदार यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाशी जुळवून घेत शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याचे आवाहन केले. रावे प्रमुख डॉ. आर. व्ही. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात येत असून कार्यक्रम समन्वयक आर. व्ही. तायडे हे विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे नियोजन करीत आहेत,त्याचप्रमाणे 

यामध्ये कृषीदूत विद्यार्थी रोहन मांदाळे, ऋषिकेश मेटांगळे, सागर मेश्राम,नयन मेश्राम.उज्ज्वल मानमोडे यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे गावात कृषीविषयक जनजागृती वाढण्यास मदत होणार असून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास हातभार लागणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.