✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि .1 जून) :- ग्रामीण भागातील शेती शेतकरी जीवन आणि कृषी विस्तार कार्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने आनंदीकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथील अंतिम वर्ष बीएससी ऍग्री चे विद्यार्थिनींचे ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमा अंतर्गत वरोरा तालुक्यातील खैरगाव गावामध्ये आगमन झाले. विद्यार्थ्यांच्या आगमनस्थ शेतकरी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच संदीप डडमल, उपसरपंच रमेश पावडे व सदस्य मालन डडमल यांनी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी पुढील काही आठवडे गावात राहून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधतील. तसेच शेतीतील विविध पिकांची माहिती कृषी समस्या, पशुपालन, जलस्थापन, शेतकऱ्याचे जीवनासही निगडित उद्योगांचा अभ्यास करणार आहेत. यासोबतच मेळावे कार्यक्रम सर्वधन उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पोतदार यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात यांनी ग्रामीण भागाशी जुळवून घेत शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याचे आवाहन केले. रावे प्रमुख डॉ. आर. व्ही. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात येत असून कार्यक्रम समन्वयक आर.व्ही. तायडे हे विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमाचे नियोजन करत आहेत.
अदिती मालविया, रेणू आखाडे, स्नेहल अकुलवार काश्मीर्या अवताडे, गंगेश्वरी बांदुरकर, कल्याणी भोयाळकर व नेहा राऊत या विद्यार्थिनी रावे कार्यक्रमामार्फत गावात दाखल झाल्या. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे गावात कृषी विषयक जनजागृती वाढण्यास मदत होणार असून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास हातभार लागणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.







