प्रजासत्ताक दिनानिमित्त खालसा कॉन्व्हेंटमध्ये शिस्त, संस्कार आणि देशभक्तीचे दर्शन – डॉ. मंगेश गुलवाडे

✒️संजय तिवारी चंद्रपूर(Chandrapur विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.27 जानेवारी) :-

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री गुरुद्वारा गुरु सिंग सभा, चंद्रपूर यांच्या वतीने संचालित खालसा कॉन्व्हेंट हायस्कूल, चंद्रपूर येथे भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास चंद्रपूर जिल्ह्याचे सुप्रसिद्ध ENT व हेड नेक कॅन्सर सर्जन तसेच भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हा चंद्रपूरचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूरचे महामंत्री 

*डॉ. मंगेश मधुकर गुलवाडे*

 हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच शैक्षणिक, क्रीडा व विविध क्षेत्रांत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या उत्कृष्ट कवायतीने शिस्त, एकात्मता व राष्ट्रप्रेमाचे प्रभावी दर्शन घडवले.

कार्यक्रमाप्रसंगी श्री गुरुद्वारा गुरु सिंग सभा, चंद्रपूरचे 

*अध्यक्ष सरदार चरणजीत सिंग बाधवा,*

 *उपाध्यक्ष सरदार चमकोरसिंग बसरा,*

 *उपाध्यक्ष सरदार पुरणसिंग जुनेजा,*

  *सदस्य सरदार परविंदर सिंग भाटिया ,*

 *कोषाध्यक्ष सरदार सुरेंद्र सिंग गिल*

 *सहसचिव अमरप्रित सिंग होरा*

यांची विशेष उपस्थिती होती. 

तसेच खालसा कॉन्व्हेंट हायस्कूलच्या *प्राचार्या श्रीमती सिमरन सहानी* शिक्षकवृंद, पालकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना 

*डॉ. मंगेश मधुकर गुलवाडे*

 यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त, संस्कार आणि देशभक्ती हे जीवनमूल्य आत्मसात करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी राष्ट्रसेवेचे योगदान द्यावे, असे आवाहन केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मता व देशप्रेमाचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले.