बांद्रा येथे जेष्ठ नागरिका करिता आरोग्य शिबिर 

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 वरोरा (दि.26 नोव्हेंबर) :- 

       तालुक्यातील बांद्रा येथे हेल्पेज इंडिया,वरलक्ष्मी फॉउंडेशन, कृषक सेतू फॉउंडेशन वरोरा व वेद संस्था शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिका करिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 या शिबिराचे उद्घाटन देवराव दडमल, माजी पंचायत समिती सदस्य बांद्रा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर खांडेकर बांद्रा,ओज संस्थेचे समन्वयक रमेश चौधरी, वेद संस्था संचालक विलास माटे,हेल्पेज इंडिया सामाजिक टीम संरक्षण अधिकारी राशेदा शेख , डॉअश्विनी मगरे इत्यादी उपस्थित होते.राशेदा शेख यांनी आरोग्याबाबत काय काळजी घ्यायची या बाबत जेष्ठ नागरिकांसोबत हितगुज साधले व आरोग्य बाबत समस्या जाणून घेतल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश चौधरी यांनी केले.

 हेल्पेज इंडिया एम.एच. यु.व वरलक्ष्मी फाउंडेशन वरोरा द्वारा गावातील 80 जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. 

या शिबिरात बी.पी.,शुगर,सर्दी,ताप,खोकला इत्यादी आजारावर उपचार करण्यात आले. याकरिता डॉक्टर अश्विनी मगरे व राशेदा शेख, फार्मासिस्ट वैभव देठे व संदीप काळे मोलाचे योगदान दिले. 

      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील महीला गटांनी, आशा वर्कर, इत्यादीनी सहकार्य केले.