माहूर येथे पुरातत्त्व विभागा तर्फे जागतिक वारसा सप्ताह निमित्त हेरिटेज वॉक” संपन्न

✒️शेख रफिक माहूर Mahur विभागीय प्रतिनिधी) 

माहूर(दि.24 नोव्हेंबर) :- 

महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालया तर्फे महाराष्ट्र जागतिक वारसा सप्ताह दि 19 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत हेरिटेज वॉक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, माहूर येथील शासकीय वस्तू संग्रहालय व माहूर किल्ल्याच्या वतीने माहूर संग्रहालय ते मातृतीर्थ तलाव व इतर पुरातन स्मारकावर आज दि,24/11/2025 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत हेरिटेज वॉक करून छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले.

यावेळी श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त “संजय काण्णव” शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष एस एस पाटील सर, रंजीत वर्मा सर, पत्रकार राज ठाकूर, चित्रकार सुरेश आराध्य, गणेश वाडेकर, बाळू चिल्लेकर, सलमान पठाण, तसेच अनेक नागरिकासह हेरिटेज वॉक कारण्यात आले, माहूर वस्तु संग्रहालयात महाराष्ट्रातील जागतिक 11 व तामिळनाडू मधील 1अशा 12 किल्ल्याचे छायाचित्राचे प्रदर्शन मांडण्यात आले.जागतिक वारसा सप्ताहाची माहिती “शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष” एस एस पाटील सर यांनी दिली,या कार्यक्रमास शासकीय वस्तू संग्रहालयाचे राखणदार सय्यद अजम, विक्रांत चिपळे, मंगेश चांदुरकर, माहूर किल्ल्याचे दिनेश कोंडे, यांनी कार्यक्रमाचे आयोजन मा, अमोल गोटे सहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग नांदेड व मयुरेश खडके, अभिरेक्षक मध्यवर्ती संग्रहालय नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.