🔸दहिसावळी रोडवरील या घटनेतील 7 फरार आरोपींना शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान
✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.16 मे) :-
महागांव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ऊटी गावात 3 मे 2026 रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मोठी घरफोडी करत मेडिकल व्यावसायिकांच्या घरीला लक्ष करत लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. दरम्यान फिंगरप्रिंट तज्ञ, स्वानपथक व फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले.या घटनेची शाही वाळते न वाळते तेच दुसरी घटना महागांव पोलीस स्टेशन हद्दीत मागील पंधरवड्या पूर्वी गुप्तधनाचे (सोन्याचे कॉइन) अल्प दरात देण्याची लालसा दाखवीत 8 जनाच्या गुप्तधन टोळक्याने गडचिरोली येथील एका व्यक्तीस 10,80,000 रु.नी गंडविल्याचे उघड झाले. आरोपीने बनावट पोलीस असल्याची बतावणी करत फिर्यादीस लुटल्याची घटना घडली. आरोपीला शोधण्याचे पोलिसा समोर तगडे आव्हान निर्माण झाले होते.
फिर्यादी संदीप रामचंद्र खोब्रागडे (वय 34 )वर्षे रा. गडचिरोली यास अज्ञात आरोपीने कमी किंमतीत गुप्तधनातुन काढलेले (सोन्याचे कॉइन) विकत देण्याची लालसा दाखवून 10 लाख 80 हजार रुपयांनी गंडविल्याचे समोर आले. घटनेच्या ठिकाणी चोरट्याच्या टोळक्यातील काही जणांनी पोलीस असल्याची बतावणी करीत रेड टाकण्याचे नाटक केल्याने फिर्यादीने घाबरून त्या ठिकाणाहून पळ काढला असल्याचे तक्रारीतून म्हटले आहे. एकंदरीत आठही भामट्यांनी संगणमत करून गडचिरोली येथील ह्या व्यक्तीस कमी किमतीत सोने घेण्याचे अमिष दाखवत लाखोंनी गंडविले. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच संदीप खोब्रागडे यांनी महागाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.
मागील पंधरवड्या पासून फसवणुकीच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा छडा लावण्याचे महागाव पोलिसा समोर आव्हान होते. एवढ्यात ऊटी या गावी धाडसी घरफोडीच्या घटनेतील आरोपी शोधण्यास महागाव पोलीस असमर्थ ठरल्याचे दिसते. सदर गुप्तधन कॉइन विक्री प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते.
गडचिरोली येथील संदीप खोब्रागडे यांनी 2 मे रोजी महागांव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे, आपणांस अनोळखी इसमाने संपर्क करून कमी किमतीमध्ये गुप्तधन (सोन्याचे कॉइन) देण्याचे आमिष दाखवत 10,80,000 रु.नी फसवणूक केली. फिर्यादीनी दिलेल्या फिर्यादीवरून महागांव पोलिसांत अज्ञात आरोपी विरोधात अपराध क्र. 216/ 2026 कलम 318 (4) 3 (5) भारतीय न्याय संहीते अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींना शोधण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने दहिसावळी रोडवरील घटनेच्या ठिकाणी बारकाईने तपास करीत गुन्ह्यातील अज्ञात आरोपीला शोधण्यासाठी तपासाचे चक्रे गतिमान केले. सदरचा गुन्हा पिंपळगाव येथील विठ्ठल पांडुरंग पवार व त्याचे इतर 7 साथीदारांनी केला असल्याची माहिती हाती आली. आरोपींचा शोधघेत पथक पिंपळगाव येथे धडकले.विठ्ठल पांडुरंग पवार रा.पिंपळगाव ता.पुसद जी. यवतमाळ या आरोपीस अतिशय सीताफिने पोलीस कौशल्याचा वापर करून ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सर्वप्रथम त्याने उरवाउडुची उत्तरे दिली. पोलीसी खाक्या दाखवताच आरोपी बोलती सुरू झाली. आरोपीला विश्वासात घेऊन अतिशय सिथापीने गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता विठ्ठल पवार व त्याची इतर 7 साथीदार यांनी फिर्यादीस गुप्तधन (सोन्याचे कॉइन) देतो असे सांगून लुटले. महागांव हद्दीमधील दहिसावळी येथे रोडवर बोलावून त्याचे कडील 10,80,000 रु. ताब्यात घेऊन आरोपीच्या टोळक्यातील काहीजण बनावट पोलीस तयार झाले. पोलीस असल्याचे समजून फिर्यादी संदीप खोब्रागडे यांनी घाबरून त्या ठिकाणाहून पळ काढला.
फिर्यादीची (10,80,000) रु.नी गंडा घातल्याचे पिंपळगाव येथे पकडलेला आरोपी विठ्ठल पांडुरंग पवार ( 34) रा.पिंपळगाव ता.पुसद जी. यवतमाळ यांच्याकडून गुन्ह्यातील फसवणूक केलेल्या रकमेपैकी 2,05,000 रोख रक्कम जप्त करून महागांव पोलीस स्टेशन येथे अपराध क्र.216/2026 कलम 318(4) 3 (5) भारतीय न्याय संहिते नुसार आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणून आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन महागाव यांच्या ताब्यात दिले आहे. परंतु गुन्ह्यातील 7 आरोपी अद्याप फरार असून त्यांना शोधण्याचे पोलिसा पुढे तगडे आव्हान उभे आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात,उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड हनुमंत गायकवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे,पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. धीरज बांडे, पो.उ.नि. शरद लोहकरे,पो.ह.कुणाल मुंडोकार,मुन्ना आडे,संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव,रमेश राठोड,सुनील पंडागळे,रवींद्र श्रीरामे, राजेश जाधव यांच्या पथकाने यशस्वीरित्या तपास करीत आरोपीस जेरबंद केले.
महागांव तालुक्यांतील ऊटी येथे 2 मे 2026 रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी महागांव येथील गजानन मेडिकलचे संचालक राजू गावंडे यांच्या घराला लक्ष करीत लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. दरम्यान तपासासाठी फिंगरप्रिंट तज्ञ, स्वानपथक व फॉरेन्सिक पथकाला प्राचारण करण्यात आले. पंधरवाडा उलटूनही घटनेतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नसल्याचे कळते.नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षकांनी दखल घेत महागांव पोलीस स्टेशन हद्दीत राजरोसपणे चालत असलेले अवैध धंद्याचे पाळेमुळे खणून सामान्य नागरिकांसाठी भयमुक्त वातावरणाची निर्मिती करावी.नागरिकांना आपल्या प्रॉपर्टीज सुरक्षित राहतील,असा पोलिस यंत्रणेबद्दल जनतेतून आत्मविश्वास वाढावा,अशी सामान्यांतून भावना व्यक्त होत आहे.







