प्रमाणिकपणा दाखविणाऱ्या रोशन भाई चा पोलिसांनी केला हृदय सत्कार

🔹भाविकाची तिन लाख रुपये किंमतीचे दागीण्याची बॅग केली होती परत

✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी) 

माहूर(दि.27 ऑक्टोबर) :- 

माहुर येथे दर्शनासाठी आलेल्या भावाकाची तिन लाख रुपये किंमतीचे दागीण्याची बॅग हरवली होती ती बॅग माहुर येथील सायकल भाड्याने देउन कुटुंबाचा चारितार्थ चालविणाऱ्या रोषण खान महेमूद खान यास सापडली असता ती बॅग माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्याकडे सुपूर्द केली असता कराड यांच्या हस्ते भाविकाला पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या स्वाधीन केल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी प्रामाणिकपणा दाखविणाऱ्या रोशन भाईला पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत हृदय सत्कार केला.

 दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत लाखो भाविक भक्तियुक्त अंतःकरणाने आई श्री रेणुका मातेला साडी ओटी विडा महानैवैद्य अर्पण करून दर्शन घेण्यासाठी गडावर येत असतात त्यांचे जवळ महिलांचे दागिन्यांसह मौल्यवान वस्तू देखील सोबत घेऊन येत असतात असेच मंठा जिल्हा जालना येथील भाविक योगेश किशोर राव दाशेळकर हे दि 21ऑक्टोंबर 2025रोजी सहकुटुंब मातेच्या दर्शनासाठी गडावर आले असता आपली रक्कम दागदागिने असलेली बॅग विसरले सदर बॅग शहरातील मुस्लिम समाजाच्या सायकल टॅक्सी चालक रोषणभैया यांना सापडली असता क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पोलीस ठाणे गाठून सदर बॅग पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्याकडे सुपूर्द केली होती बॅग परत केल्याबद्दल रोषणभैय्या व पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे भाविकांनीआभार मानले होते .

पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी रोशन भैय्या यांना दि 27 रोजी माहूर पोलीस ठाण्यात बोलावून हृदय सत्कार केला आणि माहूरकरांनी गडावर येणाऱ्या भाविका सोबत सौहार्दपणे वागावे असे आवाहन केले यावेळी सपोनी शरद घोडके सपो उपनिं संदीप अन्येबोईनवाड सपोउपनी मारुती चव्हाण पोहेका लक्ष्मण मेश्राम पोका गजानन जाधव बालाजी राठोड पवन राऊत पो ना प्रकाश गेडाम, नगरसेवक प्रतिनिधी निसार कुरेशी पत्रकार विजय आमले सरफराज दोसानी राज ठाकूर इलियास बावाणी फिरोज पठाण नारायणजी मेहता रशीद खान हमीद खान सलमान खान खुशाल मेहता अब्दुल भाई एजाज भाई यांचेसह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.