🔹आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश झाल्याने चर्चांना उधान
✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.27 ऑक्टोबर) :-
माहूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी पुत्र पिंटू आशीर्वाद पाटील (वायफनीकर) यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आमदार हेमंत पाटील यांनी त्यांचा हृदय सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे, विविध शेतकरी आंदोलने, सिंचन, वीजपुरवठा, शेतमाल दरवाढ यांसारख्या विषयांवर नेहमीच सक्रिय राहणारे पिंटू पाटील हे माहूर तालुक्यातील तरुण शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक व जनहिताचे उपक्रम राबवले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना व्हाव्यात म्हणून त्यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला आहे .
या पक्षप्रवेश सोहळ्यास मा. आमदार व कॅबिनेट मंत्री हेमंत पाटील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक, उपसरपंच अरविंद पाटील, विलास पाटील भगवती, आदित्य कदम, बालाजी गायकवाड, राजू कदम, सोनू पाटील, ईश्वर परेकर, सचिन कलाने, रवी तोंडकुलवार, प्रणय राऊत ओम शिंदे भरत मुधळे भास्कर पाटील अनिकेत सूर्यवंशी शेख अबरार प्रदीप भोसले अंबर चव्हाण यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, वाई जिल्हा परिषदेसाठी पिंटू पाटील हे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन मा. हेमंत भाऊ पाटील यांनी या वेळी दिले या प्रवेशामुळे माहूर तालुक्यातील शिंदे गट अधिक मजबूत झाला असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना नवा आवाज मिळाल्याचे चित्र स्थानिक पातळीवर दिसून येत आहे.







