✒️ सौ. सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)
राजुरा(दि.16 ऑगस्ट) :-
भारतीय परंपरा, संस्कृती आणि भक्तीमय उत्साहात ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूल आणि सनराइज इंग्लिश स्कूलने १६ ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी आनंदाने साजरा केली. यावेळी विधाता फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभांगी धोटे, बीडीआयपीएस केंद्र संचालक अॅड. मनोज काकडे आणि गोपिका अडानिया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक ,कर्मचारी उपस्थित होते. यावेळी चिमुकल्यानि राधा कृष्णाची वेशभूषा, नृत्य सादर केले .
वृंदावनातील कथांमधील भगवान कृष्ण, राधा, गोपी आणि इतर पात्रांच्या वेशभूषेत लहान मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने प्रार्थना समारंभाने झाली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले ज्यात सामूहिक नृत्य, भजन आणि कृष्णाच्या लीला आणि खोडकर बाजूचे प्रतीक असलेल्या दहीहंडीचे पुनरुज्जीवन करण्यात आले.या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वेशभूषा स्पर्धा. जिथे विविध वयोगटातील विद्यार्थी पारंपारिक पोशाख परिधान करून कार्यक्रमात आनंद आणि उत्साह वातावरण निर्माण केले. बालवयातच हसतखेळत व विविध उपक्रमांच्या साह्याने शिक्षण देणारी ही शाळा अल्पावधीतच नावारुपास आली आहे.
याकरिता या शाळेचे सल्लागार सदस्य संदीप मालेकर, जयश्री मालेकर , मुख्याध्यापिका सीमा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या सहाय्यक शिक्षिका आलिशा सय्यद, प्रीती सिंग, फिजा शेख, मानसी, प्रणाली नगराळे, स्नेहल कोंडावार, ममता मॅडम यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम घेण्यात येतात. याकरिता ममता, अर्चना व सुषमाताई या मदतनीस चे सहकार्य लाभले. या कार्यक्रमांमध्ये पालकांनी समाधान व्यक्त करीत शाळेमध्ये विविध उपक्रमातून मुलांना शिक्षण दिल्या जाते याबाबत स्तुती केली.







