टेमुर्डा येथे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ञिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.30 मे) :- लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०० वा जन्मोत्सव अर्थात ञिशताब्दी जन्मोत्सव साजरा करण्याचे अहोभाग्य आपणा सर्वाना लाभले आहे.आदर्श प्रशासक,निष्पक्ष न्यायदाती,धर्मनिष्ठ,तसेच लोककल्यानकारी कार्यासाठी इतिहासात अजरामर झाल्या आहेत.

अनैक जनसेवा कार्य,धर्मार्थ कार्य केल्यामुळे लोक त्यांना पुण्यश्लोक लोकमाता म्हणून अत्यंत आदराने गौरवितात.३१ मे २०२५ ला त्यांची ञिशताब्दी शासन-प्रशासनच्या वतीने देशभर साजरी होणार आहे.याच प्रसंगाचे औचित साधून ३१ मे २०२५ रोज शनिवारला टेमुर्डा ता.वरोरा येथे सकाळी १० वाजता भव्य रँली व ञिशताब्दी जन्मोत्सवा निमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उद्धाटक – मा. करण देवतळे वरोरा,भद्रावती निर्वाचन क्षेञ

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.गजानन शेळके- अध्यक्ष ञिशताब्दी जन्मोत्सव समिती ता.वरोरा प्रमुख अतिथी- मा.सुचिता ठाकरे 

सरपंच टेमुर्डा मा.वासुदेव आस्कर प्रदेश उपाध्यक्ष धनगर समाज महासंघ महाराष्ट

मा.वामन तुरके सिनेट सदस्य नागपूर विद्यापिठ मा.रमेश बुच्चे अध्यक्ष धनगर महचसंघ चंद्रपूर

मा.डाँ.प्रफुल खुजे अधिक्षक उपजिल्हा रूग्णालय वरोरा

मा.डाँ.सतिश अघडते पशुधन विकास अधिकारी वरोरा

मा.सुरेशभचऊ टेकाम माजी जि.प सदस्य चंद्रपूर मा.अशोकराव भोंग अध्यक्ष गुरूदेव सेवा मंडळ टेमुर्डा

ञिशताब्दी जन्मोत्सव महोत्सवाचे औचित्याने टेमुर्डा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मरणार्थ सभागृह बांधकाम नियोजित जागेचे शासन -प्रशासनाद्वारे भूमीपूजन होणार असल्याने परीसरातील धनगर बांधवात आनंदाचे वातावरण असून संयोजक विलास झिले,शंकरराव तुराळे,मारोती झाडे डाँ.अमित झिले,दिलिप तुराळे गजानन शेळके,पंडीत लोंढे यांनी ञिशताब्दी जन्मोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.