महावितरण अधिकारी व कर्मचारी यांचे हलगर्जी पणाने शेतकऱ्याची जनावरे मृत्यूमुखी 

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू ( Shegaon bu प्रतिनिधी) 

शेगाव बू (दि.17 मे) :- दि. १६ मे ला सायंकाळी ५ च्या दरम्यान झालेल्या वादळी पाऊसामुळे वरोरा तालुक्यातील वडधा तु. या गावाला लागत असलेल्या शेतात विजेच्या तारा तुटून खाली पडल्या होत्या. जाची गावतील नागरिक यांनी चारगावं बु येथील सब स्टेशन चे सहाय्यक अभियंता व लाईन मन यांना वारंवार फोन द्वारे माहिती दिली. परंतु एम. एस. ई. बी. कर्मचारी यांनी पूर्ण रात्र जाऊन लाईट बंद केली नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमी प्रमाणे वसंता घुघल हे आपल्या शेतात जाणवरे घेऊन जात असताना गावा शेजारी असलेल्या अशोक डोमाजी मत्ते यांचे शेतात पडून असलेल्या जिवन्त विजेच्या ताराला जाणवराचं स्पर्श होऊन १ बैल, १ गाय, १ वासरू असे एकूण तीन जाणवरे जागीच मृत्यूमुखी पडले. त्याच्या मागोमाग शेतकरी वसंता घुघल हे सुद्धा आणखी ६ ते ७ जाणवरे घेऊन होते. समोरील जाणवरे इचानक ताडपडायला लागल्यामुळे त्यांना हा प्रकार लक्षात आल्याने इतर जाणवरे त्यांनी दूर हाकलून लावली व स्वतःचाही दूर होऊन त्या तरेला स्पर्श होऊ दिले नाही. 

गावकऱ्यांचे या बाबत आक्रमक भूमिका घेतली असून हा सगळं प्रकार एम. ई. सी. बी. च्या कर्मचारी व अधिकारी यांचे हलगर्जी पणामुळे झाली असल्याने त्यांनी त्या शेतकऱ्याला योग्य तो माबदला मिळाला पाहिजे अशी मागणी गावकरी यांनी या वेळेला केली.

आधिच एकीकडे शेतमालाला योग्य भाव नसल्या कारणांनी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्यातच आता अशा आकस्मित संकटाने शेतकरी मात्र पूर्ण पणे खचलेला गेला आहे.

दरम्यान घटनेचा मोका पंचनामा वडधा तु. चे पटवारी पवार यांनी केला असून त्या वेळी गावातील पोलीस पाटील रिता प्रमोद लेडांगे, माझी सरपंच सुनिल सातपुते, सामाजिक कार्यकर्ते अभिजित पावडे, बाळकृष्ण डाहुले, मंगल बुरान, आदी गावातील नागरिक व महिला सुद्धा उपस्थिती होते. 

 चारगावं बु येथील पशु वैद्यकीय अधिकारी डांगरे, आणि बारेकर यांनी घटनास्थळ पंचनामा केला आहे. सोबतच शेगाव पोलीस स्टेशन चे कर्मचारी नितीन भैसारे व रजकुमार उकेटोयने हे सुद्धा उपस्थिती होते. 

या बद्दल एम. एस. ई. बी. चे सहाय्यक अभियंता यांना विचारणा केली असता मला फक्त गावातील लाईट डिम असल्याची माहिती फोन वर आली होती. तार तुटल्याची कोणतीही माहिती मला आलेली नाही अशे साहायक अभियंता रामटेके यांनी दिली.