✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.21 एप्रिल) :- समाजकार्य बहुुद्देशिय संस्था व STUDY POINT ACADEMY यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेमिनार व गुणवंत विध्यार्थी सत्कार समारंभ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भरपूर विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शवला. यामध्ये स्पर्धा परीक्षा MPSC, UPSC, पोलीस भरती, सरळ सेवा भरती, बँकिंग, रेल्वे या पदाकरिता असणाऱ्या अभ्यासक्रमाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. STUDY POINT ACADEMY मार्फत ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले अशा विद्यार्थ्यांना शिल्ड प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटक श्री. काळे सर ( प्राचार्य, आनंदवन महाविद्यालय वरोरा) हे होते. यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड व स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे स्थान याबद्दलचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री कदम सर ( PSI Police Station Warora) यांनी विध्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाची सुरुवात कशी करावी व अभ्यासामध्ये कोणत्या घटकाला/टॉपिक ला महत्व देऊन अभ्यास करावा याबद्दलचे मार्गदर्शन व समुपदेशन केले.
प्रमुख पाहुणे व वक्ते श्री अक्षय पवार (PSI Police Station Warora) हे उपस्थित राहून त्यांनी परीक्षेची निवड व परीक्षेकरिता कोण कोणत्या पुस्तकावर भर देऊन परीक्षेत यश कसे संपादन करता येईल याबद्दलचे मार्गदर्शन केले.
श्रीमती नीलिमा लोणकर मॅडम यांनी STUDY POINT ACADEMY चा खडतर प्रवास सांगून विद्यार्थ्यांना यशाकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित केले. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करावी व यश संपादन करावे या बद्दल चे मार्गदर्शन देखील त्यांनी केले.विद्यार्थ्यांनी भरपूर प्रतिसाद कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.







