🔹धुळीमुळे सर्दी खोकला चे प्रमाण वाढले

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.19 ऑक्टोबर) :- स्थानिक शेगाव येथील बस स्टॉप ते कलकुंज हॉटेल पर्यंत आर्धवत कच्चा रस्ता आल्यामुळे गेल्या अनेक वर्ष पासून धुळीच्या साम्राज्याने शेगाव वसिय तसेच प्रवासी , दुचाकी चालक , रस्त्यालगत असलेले व्यावसायिक हे धुळी मुळे त्रस्त झाले असून नागरिकांमध्ये सर्दी खोकला ताप अश्या आजाराचे प्रमाण वाढले आहे…
सविस्तर असे की गेल्या सात आठ वर्षा पासून वरोरा चिमूर रस्त्याचे काम सदर एस आर के कांत्रक्षण कंपनी कडे होते तेव्हा पासून अजून पर्यंत देखील या रस्त्याचे काम अर्धवट च आहे .या रस्त्याची निर्मिती तात्काळ करण्या साठी एस आर के कांत्रकशन कंपनीने हे काम के सी सी कंपनी कडे सोपविले परंतु ही कंपनी देखील कामात हलगर्जी पणा करीत असून रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असताना देखील डोळे बंद करून बसल्या ठिकाणी तमाशा पाहत आहे.
रोजच्या धुळीच्या साम्राज्यामुळे येथील नागरिक प्रवासी तसेच रस्त्यालगत असलेले सर्व व्यापारी मंडळ हे त्रस्त असून या धूळी मुळे नागरिकांमध्ये सर्दी खोकल्याचे प्रमाण वाढले आहे शिवाय रस्त्यालगत असलेले हॉटेल तसेच खाद्यपदार्थाचे दुकाने या दुकानात दररोज धूळ येत असल्याने नागरिकांना धुडयुक्त खाद्यपदार्थ तसेच व अन्य साहित्य धुळाने माखलेले असलेले खद्य पदार्थ अन्न प्राशन करावे लागत आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य अधिकच धोक्यात येत आहे .
येथील तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून देखील गावातील पुढारी तसेच संबंधित लोक प्रतिनिधी याकडे दुर्लक्ष का करीत आहे ? असा सवाल नागरिक करीत आहे . करिता नागरिकांच्या आरोग्याचा विचार लक्षात घेऊन किमान के सी सी कंपनीने अर्धवट असलेल्या कामावर तसेच शेगाव येथील वरोरा चिमूर मुख्य मार्गावर दररोज किमान दोन-तीन वेळा पाणी मारावे जेणेकरून धूळ उडणार नाही व नागरिकांचे आरोग्य सुरळीत राहील येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सदर केसीसी कंपनीने या गंभीर समस्या कडे दखल घेतली नाही .
तर रस्त्यावर धावत असलेले त्यांच्या कंपनीचे वाहने भर रस्त्यावर तोडफोड करून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला तसेच येथील सर्व कर्मचाऱ्यांना धारेवर धरू असे देखील त्रस्त असलेले नागरिक यांनी सांगितले आहे. सदर यांच्या वाहनासह या कंपनीच्या अधिकाऱ्याना स्थानिक शेगाव पोलीस स्टेशन समोर हा पराक्रम करण्यात येईल असे ही देखील धुळणे त्रस्त असलेले व्यापारी मंडळ तसेच नागरिकांनी व्यक्त केले.






