दिव्यांगासाठी मोफत केलिपर बेल्ट

🔹मधुतारा दिव्यांग सेवा फाऊंडेशन चा उपक्रम

✒️ संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.14 जून) :- 

दिनांक 12 जून 2024 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने आणि महावीर संस्था पुणे यांच्या माध्यमातून लातूर येथील कु. विजयामाला इंगळे 80 टक्के दिव्यांग सध्या रा. पुणे यांना मोफत केलीपर बेल्ट बसवण्यात आले.

वयाच्या दुसऱ्या वर्षापासून आलेल्या अपंगत्वाला कुठे तरी चांगल्या प्रकारे चालता येईल ही आशा निर्माण झालेल्या विजयामालाने दोन्ही संस्थेचे आभार व्यक्त केले.मधु ताराच्या पुण्यातील कात्रज येथील मायाताई पवार यांना बसच्या प्रवासादरम्यान भेटलेल्या विजयाला आज केलिपर बेल्ट मिळाल्याने अत्यंत आनंद झाला.सतत तीन वर्ष वापरल्यास भविष्यात नक्कीच चालू शकेल अशी आशा महावीर संस्थेने व्यक्त केली.

या वेळी मधु ताराच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक दिव्यंगांसाठी कृत्रिम उपकरणे बसवण्यात येतील असेही महावीर संस्थेने सांगितले.

या प्रसंगी स्वतः मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी उपस्थित राहून महावीर संस्थेचे आभार मानले व आनंदाने उत्साही असलेल्या आणि केलीपर बेल्टने पायाचा पंजा खाली टेकत असल्याने आनंदित असलेल्या कु.विजयमाला हिला शुभेच्छा दिल्या.

मधु तारा प्रत्येकांसाठी प्रत्येक जण मधु तारा साठी