चाय वाल्याची मुलगी बनली साहायक प्रकल्प अधिकारी

71

🔸शेगाव च्या करिष्मा ने रचला गावातील इतर विध्यार्थ्यांसमोर आदर्श

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू.(दि.24 मार्च) :- वरोरा तालुक्यातील शेगाव बु हे गाव. गावात कुठेही स्पर्धा परीक्षा साठी कोचिंग नाही किव्हा मार्गदर्शन साठी पुरेसे पर्याय उपलब्ध नाही. मात्र एका चाय टपरी वर चाय विकणाऱ्याच्या मुलीने एम. पी. एस. सी. ची स्पर्धा परीक्षा देऊन द्वितीय श्रेणी अधिकारी बनण्याचा मान मिळविला आहे. शेगाव मधील अशोक निखारे यांची मुलगी कु. करिष्मा अशोक निखारे मुलीने २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेत यश संपादन करत गावासमोर आदर्श निर्माण केला.

करिष्मा चे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेगावं यथे ४ थी पर्यंत व ५ ते १० पर्यंत चे शिक्षण संत काशिनाथ महाराज कन्या विद्यालय शेगाव बु येथून पूर्ण केले. त्या नंतर तिने ११ व १२ वि चे शिक्षण आनंद निकेतन कॉलेज वरोरा येथून पूर्ण केले व अंजुमन कॉलेज अँड टेक्नॉलॉजी नागपूर इथून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले.

हलाकीची परिस्थिती असताना सुद्धा इथपर्यंत शिक्षण करून सुद्धा नोकरी न मिळाल्याने तिने नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी घरूनच २०१७ ला सुरू केली.

त्या नंतर २०२३ ला ति पुणे इथे क्लासेस साठी गेली.

करिष्मा ची आई ही घरी शिवणकाम करुन वडिलांना घर चालवायला हातभार लावत असते. त्यामुळे तिच्या या यशा बद्दल सम्पूर्ण गावातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशाचे कौतुक म्हणून विकास ग्रुप शेगाव तर्फे आज दि. २३ मार्च ला तिचा विनोद चिकटे यांच्या हस्ते श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

त्यावेळी आई सिंधुताई निखारे, वडील अशोक निखारे, भाऊ त्रिशूल निखारे, विनोद चिकटे सर, साळवे सर, अमोल दातारकर, देवराव साखरकर, रुपेश फुटाणे, प्रकाश चोधरी, रवी वाटकर, रंजना चिकटे मॅडम, स्वेता नरड, स्नेहा घोडमारे, विद्यार्थिनी व गावकरी हे उपस्थित होते. त्यावेळी तिने आपल्या या यशाचे श्रेय आई, वडील, गुरुजन व मित्र परिवार यांना दिले. या कार्यकमाचे संचालन चिऊ चिकटे हिने केले तर आभार स्वेता नरड यांनी मानले.